एरंडोल येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नगरपालिकेतर्फे पात्र लाभार्थ्यांची विशेष बैठक व बांधकाम परवानगी आणि निधी वाटप….

0
476

एरंडोल येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नगरपालिकेतर्फे पात्र लाभार्थ्यांची विशेष बैठक व बांधकाम परवानगी आणि निधी वाटप….

प्रमोद चौधरी
जिल्हा प्रतिनिधी जळगाव

एरंडोल येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नगरपालिकेतर्फे पात्र लाभार्थ्यांची विशेष बैठक घेऊन बांधकाम परवानगी व निधी वाटप करण्यात आला पंतप्रधान आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची विशेष बैठक 13 जुलै रोजी होऊन ज्यांनी प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अद्याप पावतो प्रत्यक्ष बांधकाम सुरू केले नाही किंवा बांधकाम परवानगीसाठी अर्ज सादर केले नाही त्यांना बांधकाम सुरू करण्याबाबत प्रोत्साहन देऊन त्यांना येत असलेल्या अडचणींवर चर्चा करण्यात आली लाभार्थींना पंधरा दिवसांची मुदत वाढ देण्यात आली त्यानंतर देखील बांधकाम सुरू न झाल्यास सदर लाभार्थ्याचे नाव मंजूर यादीतून वगळण्यात येईल अशी सूचनावजा समज देण्यात आली.
घराचे बांधकाम प्रगतिपथावर असलेल्या लाभार्थ्यांना शासनाचा प्रथमता हप्ता साठ हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला व तीन लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी वाटप करण्यात आली.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पन्नास घरांचे काम पूर्ण झालेले आहे तसेच 36 घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे नगराध्यक्ष रमेशसिंग परदेसी व मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी लाभार्थ्यांना लवकरात लवकर बांधकाम सुरू करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील नगरसेवक मनोज पाटील, योगेश देवरे, कर निरीक्षक अजित भट, देवेंद्र शिंदे, योगेश सुकटे हे उपस्थित होते. प्रास्ताविक एस आर ठाकूर सूत्रसंचालन भूषण महाजन तर आभार प्रदर्शन सौरभ बागड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here