संतुलित शरीर आणि मनासाठी योग शिवाय पर्याय नाही! भगवान पालकर पुष्पा गिरडकर यांनी कथन केले आपले अनुभव

0
483

संतुलित शरीर आणि मनासाठी योग शिवाय पर्याय नाही! भगवान पालकर पुष्पा गिरडकर यांनी कथन केले आपले अनुभव

राजूरा, किरण घाटे वि.प्र.-अनेक व्याधी ,असाध्य रोग आणि काेरोनावर मात करण्यासाठी सुध्दा योग प्राणायाम सर्वांसाठी अत्यंत आवश्यक व महत्वाचे आहे असे प्रतिपादन पतंजली याेग समितीचे जिल्हा प्रभारी भगवान पालकर यांनी केले .ते राजूरा येथील शिवाजी महाविद्यालयात आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव आणि सत्कार समारंभाच्या नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात बाेलत हाेते .याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने राजू-याच्या पुष्पा गिरडकर यांनी आपले आराेग्य विषयक प्राणायामाचे अनुभव या वेळी कथन केले .

 

 

काेरोनाच्या कठीण परिस्थितीत विविध उपक्रम पतंजली योग समिती आणि सहकारी संघटना द्वारे राबविण्यांत आले. त्यात रक्तदान शिबिर ,राशनदान, अन्नदान , मास्क वितरण, आयुष काढा, प्राणायाम ऑन लाईन शिबीर असे अनेक व विविध उपक्रम राबवणां-या संस्था आणि व्यक्तीचा शाल श्रीफळ, आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी प्रामुख्याने श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी वारकड, उपप्राचार्य खेराणी सांगडा आश्रम शाळा शिक्षक जितेंद्र नंदरधने, भारत स्वाभिमानचे अध्यक्ष पुंडलिक उराडे, सृजन नागरिक मंचचे संचालक तथा किसन सेवा समितीचे प्रभारी मिलिंद गडमवार, एम. के. सेलोटे, जिल्हा सहप्रभारी भारत स्वाभिमान, मेघा धोटे ,महिला प्रभारी राजुरा तालुका, प्रा .हरिभाऊ डोर्लीकर शांताराम वांधरे विनायक कुळमेथे, विकास कुंभारे , ओमप्रकाश गुंडावार,लांजेवार ,रोहिणी धोटे (हेलपिंग हॅन्ड ग्रुप राजुरा ) माजी आमदार सूदर्शन निमकर अँड. संजय धोटे ,अविनाश जाधव सुधाकर कुंदाेजवार अरुण धोटे, स्मिता रेभनकर प्रभारी प .यो.महिला समिती, ज्योतिताई मसराम,जिल्हा महामंत्री भारत स्वाभिमान, विजय चदावार, प्रभारी भारत स्वाभिमान, पोकळे, सपना नामपल्लीवार तालुका संघटक, चिडे प.यो.महिला समिती चंद्रपूर आदी उपस्थित हाेते . सदरहु कार्यक्रमाच्या निमित्त्याने सामुहीक योग नृत्य( महिला) योग साधिकांद्वारे सादर करण्यांत आले .जोत्सना नंदरधने, सरोज हिवरे ,नलीनी झाड़े, आरती नीकोसे अरूणा गावत्रे,माया निकोसे , वनीता उराडे्, भावना भोयर , वनीता जनपलीवार , .निता बोरीकर यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी योगसाधकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. लक्षवेधी याेग नृत्याने सर्व दर्शकांना मंत्रमुग्ध केले .या व्यतिरिक्त जीतेंद्र आणि ओम नंदरधने यांनीं अनेक कठीण आसन योगनृत्यद्वारे प्रस्तुत केले. जिल्हा योगासन स्पर्धेत शीर्षासन 1मिनिटं 22 सेकंद शीर्षासन रोहन धोटे ने प्रस्तुत करून सर्वांची मने जिंकली. 3 तास चाललेल्या गुरुपौर्णिमा आणि सत्कार सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी सर्व योगसाधकांनी अथक परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here