जटपुरा गेट परिसरातील सराय मार्केट येथून कचरा संकलन केंद्र त्वरीत हटवा – आम आदमी पार्टीने केले चंद्रपूरात जन आंदोलन

0
462

जटपुरा गेट परिसरातील सराय मार्केट येथून कचरा संकलन केंद्र त्वरीत हटवा – आम आदमी पार्टीने केले चंद्रपूरात जन आंदोलन
चंद्रपूर -किरण घाटे -वि.प्र. चंद्रपूरच्या मध्यवर्ती भागातील जटपूरा गेट स्थित सराई मार्केट येथून कचरा संकलन केंद्र हटविण्यांत यावे या मागणी साठी आज साेमवार दि. २आँगष्टला आपच्या वतीने चंद्रपूरात जन आंदोलन करण्यात आले . आम आदमी पार्टीच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची भेट घेतली व त्यांचे मार्फतीने मागणीचे एक निवेदन विभागीय आयुक्त यांना पाठविण्यांत आले .

 

 

चंद्रपूर मनपा शहरातील कचरा सराय मार्केट येथे जमा करून ताे परत दुसरीकडे हलविला जातो. त्यामुळे दिवसभर कचरा जमा असल्यामुळे या भागात दुर्गंधी येत असते .आजूबाजूच्या परिसरातील जनतेला आजाराची शक्यता नाकारता येत नाही अनेकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात आम आदमी पार्टीने मनपा आयुक्तांकडे दिनांक 26जूलैला तक्रार दाखली केली व सात दिवसाच्या आत कचरा संकलन केंद्र हटविण्याबाबत मागणी केली आयुक्ताने लवकरात लवकर ताेडगा काढु असे आश्वासन दिले.एक आठवडा लोटून सुद्धा आयुक्तांकडून कुठलेही कार्यवाही न झाल्यामुळे हे जन आंदोलन करण्यात आले . काही दिवसात तोडगा न निघाल्यास परत जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी दिला .सदरहु आंदोलनात राजेश बेले हीमायु अली संतोष दोरखंडे मयूर राईकवार भिवराज सोनी रवी पप्पुलवार, सुनील भोयर, संजीव खोब्रागडे, सिकंदर सागोरे ,अमित बोरकर, योगेश आपटे ,अफजल अली, बबन कृष्णपल्लीवार ,दिलीप तेलंग समशेर सिंग ,अजय डुकरे आदीं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here