अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

0
378

अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

मंडळाचा आणखी एक स्तुत्य उपक्रम

 

 

प्रवीण मेश्राम/कोरपना
अष्टविनायक गणेश मंडळ गडचांदूर च्या वतीने स्थानिक गांधी चौकात विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्यात आले.
अष्टविनायक गणेश मंडळ दरवर्षी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यक्रम राबवून जनहिताचे व समाजहिताचे काम गेल्या अनेक वर्षापासून मंडळातर्फे राबविले जातात त्याचाच एक भग म्हणून या वर्षी सुद्धा भव्य रक्तदान शिबिर, सीसीटिव्ही, लोकार्पण, सेवा सेतू मधून अनेक शेतकरी, बँक ग्राहक यांचे काम व दाखले मोफत देण्यात आले. दिनांक 8 सप्टेंबरला गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करून एक स्तुत्य उपक्रम मंडळाने राबविला .आयोजनासाठी अष्टविनायक गणेश मंडळाचे सतीश बिडकर, उद्धव पुरी, संजय ढेपे, सदाशिव गिरी, निखिल एकरे, दिनेश डांगी, वैभव गोरे, मेघराज एकरे, कार्तिक तुरणकार, राकेश गोरे, बादल पेचे, सचिन रागीट, बंडू चौधरी, तेजस बरसागडे, पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन उद्भव परी यांनी केले आभार शिक्षक सागर गुडेल्लीवर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here