राजुऱ्यातील काही लॉज मध्ये होत असलेल्या गैरप्रकारामुळे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याची मागणी

0
522

राजुऱ्यातील काही लॉज मध्ये होत असलेल्या गैरप्रकारामुळे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याची मागणी

 

 

राजुरा : वाढत्या औद्योगिक करणासोबत शैक्षणिक दृष्ट्या ही प्रगती करीत असलेल्या राजुरा शहरातील काही लॉज मध्ये ‘निवास’च्या नावाखाली अश्लील प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा असून या गैरप्रकारां मुळे शहरातील वातावरण अधीकच दूषित होऊ लागल्याने या गैरप्रकारांना जबादार कोण ? असा प्रश्न आता जनतेतून विचारला जाऊ लागला आहे मात्र प्रशासन अजूनही बेखबर असून सर्व लॉजपुढे सी सी टी व्ही लावण्याची मागणी ब्लॅक पँथर ग्रुपचे अध्यक्ष विजय चन्ने यांनी प्रशासनाकडे केली आहे.

शहरात तेलंगणा राज्य व गडचांदूर कडे जाणारे दोन महामार्ग आहे. या मार्गावर लॉज असून त्यात निवासाची व्यवस्था आहे. पण यातील काही लॉज मध्ये खुलेआम अश्लील प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. शाळेकरी व महाविद्यालयीन मुले या ‘ठरलेल्या’ काही लॉज मध्ये अश्लील चाळे करीत असल्याचे बोलले जात आहे. काही वयस्कर आंबटशौकीन सुध्दा लॉजचा ‘निवासी’ वापर करीत असल्याची चर्चा आहे.

कोणत्याही ओळखपत्रा शिवाय लॉज मध्ये ‘एन्ट्री’ देण्यात येत असल्याने गैरप्रकाराला वाव मिळत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या. लॉज मधील हा गोरखधंदा मागील काही महिन्यांपासून सर्रासपणे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारावरून शहरातील वातावरण मात्र दूषित होत असून प्रशासन अजूनही अनभिज्ञ असल्याने जनतेत नाराजीचा सूर दिसत आहे त्यामुळे अशा गैरप्रकारांना वाव देणाऱ्यावर कार्यवाहीची मागणी होऊ लागली.

आहे शहरात सुरू असलेल्या लॉज मधील गैरप्रकार टाळण्यासाठी लॉज समोर सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे तसेच लॉज मध्ये येणाऱ्या ग्राहकांची ओळखपत्रे तापसल्याशिवाय लॉज मालकांनी प्रवेश देऊ नये असे आढळल्यास संबंधित लॉजवर कार्यवाहीची मागणीही विजय चन्ने यांनी प्रशासनाला केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here