पोंभुर्णा येथे चंद्रकांत पाटलाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन आंदोलन

251

पोंभुर्णा येथे चंद्रकांत पाटलाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन आंदोलन

महापुरुषांबद्दल आक्षेपहार्य विधान करणाऱ्या चंद्रकांत पाटलावर गुन्हा दाखल करा

भारतीय बौध्द महासभा, वंचित बहुजन आघाडी, अखिल भारतीय माळी महासंघ यांचे ठाणेदारांना निवेदन

 

पोभुर्णा/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत बच्चु पाटील संभाजीनगर येथील कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह व बेताल विधान करुन देशातील ऐक्य एकात्मता व सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याने पोंभुर्णा येथील सावित्रीबाई फुले चौकात भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अविनाश वाळके यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत पाटलांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन निषेध नोंदवला.

संभाजीनगर येथील 9 डिसेंबर च्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत बच्चु पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह व बेताल विधान करुन देशातील ऐक्य एकात्मता व सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असुन त्यांचे हे वक्तव्य देशविघातक व देशद्रोही असुन घटनेतील तरतुदीचे उल्लंघन केले आहे. तिनही महापुरुष भारतातील थोर समाजसुधारक असुन त्यांनी केलेले कार्य देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आरएसएस प्रणीत गुंड प्रवृत्तीच्या भाजपचे नेते चंद्रकांत बच्चु पाटील हे देशातील बहुजन समाजातील लोकांच्या भावनांना ठेच पोहचवली असुन या वक्तव्याचा जाहीर निषेध करत पोंभुर्णा शहरात भारतीय बौध्द महासभा,वंचित बहुजन आघाडी , अखिल भारतीय माळी महासंघ यांच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन आंदोलन करण्यात आले. तसेच चंद्रकांत पाटलांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याच्या संदर्भाने पोंभुर्णा पोलिस स्टेशन येथे भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा पोंभुर्णा चे अध्यक्ष अविनाश वाळके, जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी चे मधुकर उराडे, तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चे एॅड रंजित खोब्रागडे, श्याम कुमार गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष माळी महासभा दादु ढोले, रमाई महीला मंडळाच्या अध्यक्षा बेबी वनकर, दुशीला उराडे, सुमण जिवने, सुरेखा उराडे,पोर्णिमा वनकर, सागरिका उराडे, नगरसेविका रिना उराडे, तालुका सचिव माळी महासंघ चे रुषी गुरुनुले, अध्यक्ष महात्मा फुले समता परिषद चे भुजंग ढोले, विकास ठाकरे, वंचित चे शहर अध्यक्ष राजु खोब्रागडे, नगरसेवक अतुल वाकडे, रवी तेलसे, लोकेश झाडे, कपिल उराडे, अनिल वाकडे, पराग उराडे, सुमित उराडे,जलिल गोवर्धन, अजय उराडे सत्कार फुलझेले, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

advt