अवैध सावकारीचा व्यवसाय बंद करण्यांची राजू झाेडेंची मागणी

0
500

अवैध सावकारीचा व्यवसाय बंद करण्यांची राजू झाेडेंची मागणी
बल्लारपूर (चंद्रपूर), किरण घाटे वि.प्र.- औद्योगिक बल्लारपूर नगरीत वाढत्या गुंड प्रवृत्ती साेबतच अवैद्य सावकारीच्या दहशतीने शहर वासियात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . त्यातच एका अॉटोचालकाने अवैद्य सावकाराच्या त्रासाला कंटाळुन गळफास घेऊन नुकतीच आत्महत्या केली.

 

 

शहरात अवैध सावकारांने (अघोषित) आपली सत्ता गुंडांच्या बळावर सुरु केली असून या सावकाराच्या भीतीने आजपर्यंत कुणीही तक्रार देत नसल्याने त्यांचे मनोबल दिवसें दिवस वाढतच आहे. बल्लारपूरात दि. ३१जूलैला बालू झाडे नामक अँटोचालकाने अवैध सावकारा कडुन ५००० रुुपुरे कर्ज ( ४० टक्के ) व्याजाने घेतले होते.परंतु लॉकडाऊन मुळे त्याचा धंदा डबघाईस आल्याने पैसे परत करण्यास उशीर झाला . तेव्हा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन अवैध सावकाराने त्याला मारहाण केली व एका दिवसात रक्कम परत न केल्यास अाँटो हिसकाऊन नेईल अशी धमकी दिल्याची चर्चा या परिसरात आहे. दुसऱ्याच दिवशी बालू झाडे यानी स्वता:च्याच घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. सावकाराच्या गुंडशाहीमुळे कुणीच तक्रार करण्यास पुढे येत नाही. सदरहुची घटना घडल्याने मृतकाच्या घरी भीतीचे वातावरण पसरले असून तक्रार केल्यास आमच्याही जीवास धोका निर्माण होऊ शकतो या भीतीने तक्रार करण्यास ते कुटुंब मागेपुढे बघत आहेत.

 

 

पोलीस प्रशासनाने स्वता:च दखल घेऊन अवैध सावकारावंर कारवाई करावी व मृतकाच्या कुटुंबातील सदस्यांना न्याय द्यावा अशी मागणी राजु झोडे तथा बल्लारपूर वासियांनी केली आहे. जर अवैद्य गुंड प्रवृत्तीचे सावकार सर्वसामान्य जनतेच्या गरिबीचा फायदा घेऊन लूटमार करत असतील तर याची माहिती आपणांस द्यावी आपण त्यांना याेग्य धडा शिकवू असे राजू झोडे यांनी प्रसिध्दीला दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here