बामणी येथे सरल फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण

0
570

बामणी येथे सरल फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण

प्रतिनिधी :- राज जुनघरे

बामणी / बल्लारशाह / चंद्रपूर:-
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बामणी ( बल्लारशाह ) येथिल सरल फाऊंडेशन च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
करोना संचारबंदी काळात जनतेला वृक्षांचे महत्त्व कडले. ऑक्सिजन चा सर्वत्र तुटवडा भासू लागला. कित्येकांना आपले प्राणही गमवावे लागले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक असते. म्हणून ” झाडें लावा, झाडे जगवा ” हा संदेश देत सरल फाऊंडेशन बामणी, बल्लारशाह तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे राजेश बट्टे , सचिन बरडे, गणेश गेडाम, राजेश टोंगे, राकेश राऊत, विनोद आलाम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here