संविधान चौक येथील सार्वजनिक कार्यालया वर हल्ला करणाऱ्या हिंगणघाटच्या सटोड्यावर कार्यवाही करा

0
628

संविधान चौक येथील सार्वजनिक कार्यालया वर हल्ला करणाऱ्या हिंगणघाटच्या सटोड्यावर कार्यवाही करा

हिंगणघाट, अनंता वायसे तालुका प्रतिनिधी

हिंगणघाट येथील संविधान चौक येथे असलेले सार्वजनिक सामाजिक कार्यालयावर रात्री १२.१५ च्या सुमारास हिंगणघाटच्या एका सटोड्यानी १४ ते १५ गुंड लोकांच्या सहकार्याने संविधान चौक येथील कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली तसेच कार्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्यांचे फोटो असलेल्या बॅनरची विटंबना केली.
या प्रकरणाची पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दाखल करण्यात आली असून या हल्लेखोरांवर पोलीस प्रशासनाने तात्काळ चौकशी करून अटक करावी. अशी मागणी करण्यात आली व सदर प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला.
या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य होत असतात भोजनदान असो किंवा इतर काही व परिसरातील नागरिक तेथे येऊन बसतात तसेच व्यक्तिगत वादातून सार्वजनिक कार्यालयावर हल्ला करणे हे कितपत योग्य. अशा हल्लेखोरांवर पोलीस प्रशासनाने ठोस पाऊल उचलून कार्यवाही करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here