स्कार्पिओ च्या धडकेत चिमुकली ठार 

0
551

स्कार्पिओ च्या धडकेत चिमुकली ठार 

पोंभूर्णा/ ०५ ऑगस्ट

स्कार्पिओने एका सहा वर्षीय बालिकेस धडक दिल्याची घटना ४ ऑगस्ट च्या सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. अवनी सुनिल खोबरे( वय ६ वर्षे) असे मृतक चिमुकली चे नाव असून ति घाटकुळ गावची रहिवासी आहे. गावातील असलेल्या सार्वजनिक नळावर पाणी आणण्यासाठी गेली असता भरधाव वेगाने येणाऱ्या MH- 49/ U 7683 क्रमांकाच्या स्कार्पिओ वाहनाने अवनी ला जबर धडक दिली या धडकेत अवनी गंभीर जखमी झाली. तिला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. आज उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक ओल्लारवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोंभुर्णा पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here