मद्यधुंद ट्रक चालकाने तिघांना चिरडले, पती-पत्नी व चिमुकली जागीच ठार

0
318

मद्यधुंद ट्रक चालकाने तिघांना चिरडले, पती-पत्नी व चिमुकली जागीच ठार

दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी


राजुरा, १३ ऑगस्ट : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अज्ञात ट्रक चालकाने धडक दिल्याने एकाच परिवारातील तीन जणांना जागीच ठार केले. हि भयंकर घटना आज ८ वाजता च्या सुमारास घडली. घटनास्थळी मोठा जमाव असून जनतेत प्रचंड असंतोष आहे.

राजुरा तालुक्यातील धोपटाळा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या झवेरी पेट्रोल पंप समोर एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एकाच परिवारातील पती-पत्नी व मुलगी यांना जागीच ठार करुन समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना सुद्धा जबर धडक दिली. दुचाकीस्वारांना चंद्रपूर जिल्हा ग्रामीण रूग्णालय येथे तातडीने हलविण्यात आले आहे. मृतकाचे नाव निलेश वैद्य ३५), पत्नी रुपाली निलेश वैद्य (२६), मुलगी मधु (३) अशी मृतकांची नावे आहेत. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here