स्थानिकांना नाेकरीत प्रथम प्राधान्य द्या ! या प्रमुख मागणीसाठी मनसेची वेकोली जी.एम. कार्यालयावर धडक !
💠🟨🟪चंद्रपूर🟪🟣🔶💠🟣किरण घाटे🟣💠
भटाळी येथील वे.को.ली जि.आर.एन कंपनीत स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी तथा इत्तर काही मागण्यांच्या संदर्भात आज मंगळवार दि.१९जानेवारीला मनसेचे शहर अध्यक्ष मनदिप रोडे, यांच्या नेतृत्वात वे.को.ली चंद्रपूर यांचे कार्यालयावर काही पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी धडक दिली. .🟣🟪🟡🟩🟢🔶या वेळी वेकोलीच्या जि.एम.सोबत कामगारांच्या विविध प्रश्नांवरुन मनसे नेत्यांची बाचाबाची झाली. असल्याचे व्रूत्त आहे . 🟪🟩💠🟡🟣कंपनीने स्थानिक भूमीपुत्रांना न्याय न दिल्यास वेकोली जी.एम .सह जी.आर.एन कंपनीच्या मॅनेजरला बाहेर फिरू देणार नाही असा दम देखिल मनसेच्या संतप्त झालेल्या पदाधिका-यांनी या वेळी दिला.
🟪💠🟡🟨वे.को.ली भटाळी कोळसा खाणीत, जी.आर.एन कंपनीत स्थानिक भूमीपुत्रांना कामावर न ठेवता आंध्रप्रदेश,तेलंगणा,उत्तरप्रदेश अशा परप्रांतीय कामगारांना कामावर ठेवल्या जात आहे. परंतु स्थानिक कामगारांना रोजगार देण्यात येत नाही .ताे राेजगार त्यांना देण्यांत या साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनदिप राेडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.🟪💠🟡🟡☀️जी.आर.एन. कंपनी व्दारे कामगारांना बोनस देण्यात यावा ,कामगारांचा हेल्थ इन्शुरन्स काढण्यात यावा, कॅम्पच्या ठिकाणी अॅम्बुलन्स सेवा सुरु करावी, सकाळी शिफ्टच्या वेळेत बदल करण्यात यावा ,कंपनीचे नादुरुस्त वाहन दुरुस्त करण्यांत यावे . आदि विविध मागण्या या आंदाेलनाच्या वेळी करण्यांत आल्या . या मागण्यांची पुर्तता न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन करण्यांचा इशारा देण्यांत आला .💠🟡🟪☀️🟣सदरहु आंदाेलनाच्या वेळी मनसे शहर अध्यक्ष मनदिप रोडे महिला जिल्हाध्यक्ष (मनसे) सुनिताताई गायकवाड,शहर सचिव सुमीत करपे, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, आकाश भालेराव संगीताताई धात्रक, स्वाभी राऊत बाळा चंदनवार, संदिप अरडे, राहूल मडावी, कृष्णा गुप्ता, मिथुन महाकुलकर, रोषन बदकी, तुषार रागीट, मुकेश बावणे, आशिष शेंडे, अनिल कपाटे, संजय फरडे, आदि उपस्थित होते.
