ऑक्सिजन पार्क व बांबू गार्डन चा इको- टुरिझम व बॉटनिकल गार्डन च्या धर्तीवर विकास

0
457

ऑक्सिजन पार्क व बांबू गार्डन चा इको- टुरिझम व बॉटनिकल गार्डन च्या धर्तीवर विकास

आ.सुलभाताई खोडके यांनी अवलोकन करीत मांडली पर्यावरण पूरक संकल्पना

हरिच्छादित वनराई व प्राणवायूसाठी नागरिकांनी फुलवावी ऑक्सिजन पार्क

*प्रतिनिधी/ देवेंद्र भोंडे*

अमरावती १९ जानेवारी : शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून , झाडांची संख्या तितक्यात झपाट्याने कमी होत आहे . त्यामुळे शहराचे तापमान उंचावत असून प्रदूषणातही वाढ झाली आहे . यावर उपाययोजना म्हणून वनविभाच्या वतीने अमरावतीत ऑक्सिजन पार्क व वडाळी बांबू गार्डन साकारण्यात आले आहे . यात विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करून संगोपण केले जात आहे . वृक्षांच्या माध्यमातून सावली व शुद्ध प्राणवायू देणाऱ्या ऑक्सिजन पार्क येथील रोपांची लागवड , उपलब्ध सुविधा व नव्याने विस्तारित सेवांचा आढावा घेण्याकरिता अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी ऑक्सिजन पार्क ला भेट दिली .
यावेळी ऑक्सिजन पार्क येथे सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासह उपवनसरंक्षक चंद्रशेखरनं बाला यांच्या मार्फत सर्वसामान्यांकरिता ऑक्सिजन पार्क कधी खुले होणार, याची माहिती जाणून घेतली. ऑक्सिजन पार्क येथे मानवी प्रजातीकरिता पर्याप्त प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या विविध वृक्षप्रजातींची लागवड करण्यात आली आहे. यासोबतच स्थानीय परिसरात निसर्ग पाऊलवाट ची सुद्धा निर्मिती करण्यात आली आहे. विशेष करून लहान मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रन्स प्ले एरिया ची निर्मिती करण्यात आल्याची सुद्धा माहिती आमदार महोदयांना देण्यात आली.ऑक्सिजन पार्क मुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली असून आरोग्यदायी अशा झाडांनी व रोपांनी हा परिसर नटलेला आहे . शुद्धप्राणवायू व सावली देणाऱ्या या निसर्गरम्य स्थळाकडे नागरिकांचे आकर्षण वाढावे यासाठी ऑक्सिजन पार्क चा पर्यटन स्थळाच्या धर्तीवर विकास करण्याची सूचना आ. सुलभाताई खोडके यांनी केली . तसेच ऑक्सिजन पार्क लवकरच अमरावतीकर व निसर्गप्रेमींसाठी साठी खुला करण्याबाबतही आ . सुलभाताई खोडके यांनी संबंधितांना सूचना केल्यात .
तद्नंतर वडाळी वनपरिक्षेत्र स्थित बांबू गार्डन ला आमदार महोदयांच्या वतीने भेट देण्यात आली. यावेळी पाहणी करताना वनविभागाच्या वतीने ‘कलेक्शन ऑफ बांबू स्पेसीज- सेंट्रल नर्सरी अमरावती फॉरेस्ट डिव्हिजन’ नामक माहिती पुस्तिका आ.सौ. सुलभाताई खोडके यांना अवलोकनार्थ सादर करण्यात आली. यादरम्यान विविध प्रकारच्या बांबू प्रजातींची माहिती देण्यासह येथील वन, वृक्ष संपदेला घेऊन सुद्धा आमदार महोदयां अवगत करण्यात आले. तसेच बांबू पासून निर्मित विविध आकर्षक फर्निचर तथा वंदन जनधन शॉप ची पाहणी करण्यासह सौ. सुलभाताई खोडके यांच्या वतीने इंटरप्रिटेशन सेंटरला सुद्धा भेट देण्यात आली . तदनंतर बांबूच्या विविध मौल्यवान प्रजातींची माहिती जाणून घेण्यासह आमदार महोदयांद्वारे बांबू सॅम्पल प्लॉट चे देखील अवलोकन करण्यात आले . पर्यटकांचा कल या भागाकडे वाढावा तसेच ऑक्सिजन पार्क व बांबू गार्डन येथे अनेक नवीनतम सुविधांची उपलब्धी करण्यासह हा परिसर कसा विकसित करण्यात येईल. आदींसहित विविध बाबींना घेऊन तसेच पर्यटनस्थळ म्हणून याची एक अग्रगण्य ओळख होण्याकरिता नेमके कोणत्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी लागेल. याकरिता आ. सौ. सुलभाताई खोडकेंद्वारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी या भेटीदरम्यान चर्चा करण्यात आली . चिखलदरा पर्यटन स्थळाप्रमाणे अमरावतीतील वडाळी बांबू गार्डनचा विकास करून येथील पर्यावरण प्रेमी व पर्यटक आकर्षित व्हावा, यासाठी पश्चिम बंगाल व कर्नाटक मधील बॉटनिकल गार्डनच्या धर्तीवर बांबू गार्डनचा विकास करण्यावर आ . सुलभाताई खोडके यांनी विशेष भर दर्शविला आहे. याबाबतचा विकास व व्यवस्थापन करण्याला घेऊन एक तज्ञ सल्लागार नेमण्यात यावा. जेणेकरून बांबू गार्डनचे बोटनिकल गार्डनच्या धर्तीवर देखभाल, संवर्धन व व्यवस्थापन करणे सोयीचे होईल. बॉटनिकल गार्डन मधील विविध प्रजातींची रोपे व येथील ग्रीनरी मुळे या स्थळाचे आकर्षण देखील वाढणार आहे. नजीकच्या काळात बांबू गार्डन हे मोठे पर्यटक स्थळ म्हणून विकसित होऊ शकत असल्याने वनविभागाने याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देखील आमदार सुलभाताई खोडके यांनी केल्या. या कामाकरिता शासनाकडून पर्याप्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपली तयारी असल्याचा मनोदय आमदार सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला. राज्यशासनाच्या वनविभाग मंत्रालयाकडे याकरिता आपण पाठपुरावा करीत हा परिसर पर्यटनाचे दृष्टीने अग्रेसर होण्याकरिता आपण प्रयत्नरत राहू, अशी भूमिका यावेळी आमदार महोदयांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. निसर्गाचा समतोल कायम राखण्यासह पर्यावरण सरंक्षणाला घेऊन वृक्षवल्लीचे एक आगळेवेगळे असे महत्व आहे. स्थानीय परिसरात बांबूच्या विविध प्रजातींची लागवड व त्याची नियमित देखभाल करण्यासह मध्यवर्ती रोपवाटिकेतील महत्वपूर्ण ठरणाऱ्या ऑक्सिजन पार्क व बांबू गार्डन चे संगोपन करीत नागरिकांनी हरिच्छादित वनराई व प्राणवायूसाठी ऑक्सिजन पार्क फुलवून निसर्गाशी नाते जोडण्याचे आवाहन आ. सुलभाताई खोडके यांच्या वतीने करण्यात आले .
याप्रसंगी आ. सौ सुलभाताई खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके , वनविभाग अमरावतीचे उप वनसंरक्षक चंद्रशेखरन बाला , वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलाश भुंबर,वनपाल वर्तुळ अधिकारी श्याम देशमुख,वडाळी मध्यवर्ती रोप वाटिका वनपाल प्रदीप बावणे , वनरक्षक शेख इकबाल,भानखेड बीट चे वनरक्षक चंद्रकांत चोले, वनविभागाचे सुनील काटघळे, यश खोडके ,माजी नगरसेवक विजय बाभुळकर, जस्सो नंदावाले, ममता आवारे , माजी महापौर ऍड . किशोर शेळके , माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर , नगरसेवक प्रशांत डवरे , प्रमोद महल्ले , भोजराज काळे , प्रवीण मेश्राम , लकी नंदा , जितेंद्र ठाकूर , रतन डेंडुले , बंडू धोटे , जुम्मा हसन नंदावाले ,अशोक हजारे , दिनेश देशमुख , गजानन बरडे , सुनील रायटे ,अमोल वानखडे , प्रशांत धर्माळे ,नितीन भेटाळू , मनोज केवले , श्रीधर देशमुख , चेतन वाठोडकर , जहाँगीर नंदावाले , धीरज श्रीवास , निलेश शर्मा , श्रीकांत झंवर , कर्नालसिंग राहल , संदीप आवारे , जितेंद्र ठाकुर, ज्ञानेश्वर माळोदे, संजय मळणकर, मनोज सोळंके, आदिसहित कार्यकर्ते व पदाधिकारी व स्थानीय नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here