जिल्हा परिषद सदस्या मेघा नलगे ह्यांना तात्काळ अटक करा : बिरसा क्रांती दलाची मागणी
राजूरा (चंद्रपूर)🟩किरण घाटे🟨चंद्रपूर जिल्ह्यातील देवाड़ा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागनाथ डुडुले ह्यांना त्याच्या ओपीडी मध्ये घुसून चप्पल मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तथा शिवीगाळ करुन धमकी दिली गेली. तरी देखिल जिल्हा परिषद सदस्या मेघा नलगे ह्यांना का अटक केली नाही असा प्रश्न तालुक्यातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. बिरसा क्रांति दल चंद्रपूरचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कुळमेथे, जिल्हा महासचिव जीतेश कुळमेथे, प्रदीप गेडाम ह्यांनी चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक ह्यांची भेट घेऊन झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी एका निवेदनातुन केली आहे.
आरोपी मेघा नलगे ह्यांच्या वर 17/3/2021 ला पहाटे 2.53 ला अप. क्र. 107/21 कलम 186, 504, 506. 3(1) (P).3(1) (Q). 3(2) (VA) ला गुन्हा दाखल करण्यात आला.
साक्षीदाराचे बयान व बिरसा क्रांति दलचा सतत पाठपुरावा केल्या नंतर 23/03/2021 दुपारी 2.45 ला 353 भा.द.वी. कलम लावण्यात आली. परंतु अद्याप आरोपी मेघा नलगेला अटक का केली नाही? असा प्रश्न जनतेतुन विचारल्या जात आहे.
सदर प्रकरणात पीडित डॉक्टरला उचित न्याय मिळत नसेल तसेच आरोपी मेघा नलगे ला अटक केली नाही तर बिरसा क्रांती दलच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन उभे करू असा इशारा प्रशासनाला जिल्हा उपाध्यक्ष संतोष कुळमेथे, जिल्हा महासचिव जीतेश कुळमेथे, प्रदीप भाऊ गेडाम, शुभम आत्राम, विनोद शेडमाके, रवी मेश्राम आदिंनी एका पत्रकातुन नुकताच दिला आहे.
