शहरात देशी कट्ट्यासह घातक हत्यारे जप्त, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
1255

शहरात देशी कट्ट्यासह घातक हत्यारे जप्त, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

 

राजुरा : राजुरा शहरात देशी कट्ट्या सह, दोन पिस्तुल, एक तलवार यासोबतच एक घटक शस्त्र पोलिसांनी जप्त करून आरोपींना ताब्यात घेतल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अवैध कोळसा तस्करी, गोवंश तस्करी, रेती तस्करी, जुगार, अंमली पदार्थ विक्रीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसुन येत असतानाच राजुरा पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर अवैध घातक शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 25 जुलै रोजी सकाळी गस्तीवर असलेल्या पोलीस चमूला गोपनीय माहिती मिळाली. यानुसार शहरातील सोमनाथ पूर वॉर्ड येथील तिघांनी बिहार राज्यातून घातक शस्त्र आणले असुन भविष्यात काहीतरी मोठी घटना घडण्याची दाट शक्यता आहे.

गस्ती पथकाने मिळालेली माहिती तात्काळ वरिष्ठांना कळवली त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी ह्यांच्या कुशल मार्गदर्शनात ठाणेदार बहादुरे ह्यांच्या अचुक नियोजनात सहा. पोलीस निरीक्षक एस व्हि दरेकर ह्यांच्या नेतृत्वात पोउनि हिराचंद गव्हारे, नापोशी नागोराव भेंडेकर, नापोशी संदीप बुरडकर, पोशी रामा भिंगेवाड ह्यांच्या चमूने चातुर्याने संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्यांच्याकडे 1 पिस्तौल, 2 देशिकट्टे, स्टील तलवार तसेच चक्र असलले 1 घातक शस्त्र ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस चमूने लावजोत सिंग हरदेव सिंग देवल, यांच्यासह विधिसंघर्ष बालकाला अपराध क्र. 304/22 अंतर्गत आर्म ऍक्टच्या कलम 3, 4, 25 अन्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here