दरमाह 1 रुपया गुंतवा अन 2 लाख मिळवा

0
678

दरमाह 1 रुपया गुंतवा अन 2 लाख मिळवा

स्टेट बँकेची योजना

प्रमोद राऊत खडसंगी

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आता खातेधारक ग्राहकांसाठी नवनवीन योजना आल्या असून त्यांची नागरिका पर्यँत जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये दर महिन्याला 1 रुपया भरा म्हणजे वर्षाचे 12 रुपये भरायचे अन अपघात किंवा अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीला जनधन खात्यातून 2 लाख रुपये लाभ मिळणार आहे.
चिमूर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची मुख्य बँक शाखा असून, खडसंगी वरून 12 ते 15 किमीच्या अंतरावर असून, खडसंगी जवळील परिसरातील नागरिकांना व वयोवृद्ध नागरिकांना जाण्यायेण्या त्रास होत असतो. त्यामुळं हा नागरिकांचा व खातेधारकाचा त्रास वाचावा व त्यांचा वेळ वाचावा याकरिता खडसंगी येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची मिनी बँक (छोटी शाखा) असून, येथे खडसंगी येथील जवळपासचे खातेधारक येत असतात. या खातेधारकासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने नवनवे केंद्र शासनाच्या योजना आणल्या असून, या केंद्राच्या नवनव्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या योजना गावखेड्यातील नागरिकापर्यंत कश्या पोहचतील या उद्देशाने स्टेट बँक ऑफ इंडिया चे मुख्य प्रबंधक भोया एकन्ना व उपप्रबंधक दिलीप खडगी हे चिमूर तालुक्यातील गाव खेड्यात असणाऱ्या मिनी बँक मध्ये भेट देऊन छोटे खाणी कार्यक्रम घेऊन खातेधारक व नागरिकांना तसेच गावातील लोकप्रतिनिधी यांना योजना बद्दल सविस्तर माहिती देऊन गावातील नागरिक व वयोवृद्ध अश्या वयाच्या 18 ते 70 वर्षापर्यंत असणाऱ्या नागरिकापर्यँत अनेक अश्या स्टेट बँकेच्या योजना असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक भोया एकन्ना हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य पुंडलिक मत्ते हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट बँकेचे उपप्रबंधक दिलीप खडगी, जेष्ठ नागरिक भगवान ननावरे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राऊत हे होते. यावेळी पंचायत समिती सदस्य पुंडलिक मत्ते यांनी सांगितले की, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अनेक योजना चांगल्या असून, या योजनांचा लाभ 18 ते 70 वर्षातील खातेधारकांनी घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दिलीप सातपैसे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला विशेष सहकार्य मिनी बँक चालक संकेत घनश्याम सूर्यवंशी यांनी केले.

*तर अश्या आहेत योजना*
जनधन योजनेचे खाते काढल्यास त्यांच्याकरिता प्रत्येक महिन्याला 1 रुपया भरायचा म्हणजे एका वर्षाचे 12 रुपये भरायचे आहे. त्यामध्ये कोणाचा अपघात झाला किंवा अपंगत्व आले तर त्यांना 2 लाख रुपयांचा फायदा मिळणार आहे. हि योजना वयाच्या 18 ते 70 वर्षातील कोणीही व्यक्ती लाभ घेऊ शकते.
दुसरी योजना म्हणजे, वर्षाचे 330 रुपये भरायचे व वयाच्या 18 ते 50 वर्षापर्यँत कोणत्याही प्रकारे खातेधारकाचे मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मिळतील.
तिसरी योजना म्हणजे अटल पेन्शन योजना आहे. यामध्ये सुद्धा 18 ते 40 वयाच्या खातेधारकासाठी असून, यात वयानुसार मासिक 210 रुपयापासून ते 1 हजार 454 रुपया पर्यँत स्टेट बँकेचे प्लॅन असून, मासिक 5 हजार रुपये पेन्शन खातेधारकाना मिळणार आहेत. या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योजने करिता खडसंगी येथील मिनी बँक मध्ये अधिक माहिती करिता भेट देऊन सविस्तर माहिती घेऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here