महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्यासपीठाच्या अल्का सदावर्तेंची आज चंद्रपूर आकाशवाणीवर मुलाखत !
राजूरा चंद्रपूर✍🏻 किरण घाटे विशेष प्रतिनिधी – महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्यासपीठाच्या जेष्ठ सदस्या तथा राजूरा येथील मुळ रहिवाशी असलेल्या अल्का सदावर्ते यांची चंद्रपूर आकाशवाणीवर आज रविवार दि.१३जूनला दुपारी १२वाजता एक मुलाखत प्रसारित हाेत आहे .या साेबतच त्यांचे गित गायनचा कार्यक्रम हाेणार असल्याचे त्यांनी आज( शनिवारी) या प्रतिनिधीस सांगितले .या पूर्वी सुध्दा सदावर्ते यांचे कार्यक्रम चंद्रपूर आकाशवाणीवर प्रसारित झाले आहे .सहजं सुचलंच्या काव्यकुंज या सदरात त्या नियमित लिहत असतात .आज पावेताे त्यांनी अनेक गिते आपल्या मधुर व गाेड आवाजात गायिली आहे .हे विशेष !
Home Breaking News महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्यासपीठाच्या अल्का सदावर्तेंची आज चंद्रपूर आकाशवाणीवर मुलाखत !