दरवर्षीप्रमाणे यंदाही महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने नागवंश युथ फोर्स राजुऱ्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0
334

दरवर्षीप्रमाणे यंदाही महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने नागवंश युथ फोर्स राजुऱ्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


राजुरा : सामाजिक कार्यात नेहमीच हिरिरीने भाग घेऊन ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या संकल्पनेतून वसा घेतलेले सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत व त्यांचे नागवंश युथ फोर्स युवा मंडळ यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वभूषण महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त महापुरुषांना विनम्र अभिवादन करण्याकरिता खरी आदरांजली अर्पण करण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
अमोल राऊत व त्यांचा ग्रुप हा वर्षातून दोनदा रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजातील गरीब गरजूंना नेहमी रक्ताची मदत मोठ्या सेवाभावेने करत असतात. 11 एप्रिलला क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिना प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. बुद्धभूमी बस स्थानक समोर राजुरा येथे सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत.
नागवंश युथ फोर्स राजुऱ्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मुख्य संयोजक अमोल राऊत यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here