शासन परिपत्रक विराेधात काळ्या फिती लावून जिल्हाभर आंदोलन

0
595

शासन परिपत्रक विराेधात काळ्या फिती लावून जिल्हाभर आंदोलन

चंद्रपूर जिल्हाधिका-यां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर 

चंद्रपूर (विदर्भ), किरण घाटे – राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून पदोन्नती मधील आरक्षणच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना संविधानिक अधिकारा पासून वंचित ठेवण्यासाठी जो काळा जि.आर.काढला त्याविरुद्ध आज बुधवार दि.१९मे ला राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने चंद्रपूर सह जिल्हाभर काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, प्रोटान, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ, राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय बेरोजगार युवा विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद ,बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुकास्तरांवर तहसीलदार यांना यांना निवेदन दिले. दरम्यान चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले .या वेळी डाँ .ज्याेत्सना भागवत , धनराज गेडाम , प्रा.कविता चंदनखेडे , स्वप्निल कांबळे , मनाेहर बांदरे , प्रा.सुचिता खाेब्रागडे , विकास काळे , सुधाकर चाैखे , संजय पाटील , के .एस .पडवेकर, गीता साेमकुंवर , संदीप काेवे , सप्रेम गेडाम , धम्म नगराळे , गाैतम नगराळे , आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते. जिल्ह्याभरात या आंदाेलनाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे व्रूत्त आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here