पत्रकारास अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई करा!

0
552

पत्रकारास अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई करा!

पुरोगामी पत्रकार संघ सिंदेवाही यांची निवेदनातून ठाणेदार यांच्याकडे मागणी

सिंदेवाही/प्रतिनिधी : कोरोना या जागतिक महामारीच्या काळात पत्रकार फ्रंट लाईन वर्कर म्हणून आपल्या जीवाची व कुटुंबांची पर्वा न करता वृत्त संकलन करून काम करत आहे. या संकटात शासन प्रशासनाच्या व नवरगाव येथील ग्रामपंचायतच्या उदासीन कारभारा विरोधात येथील स्थानिक पत्रकार अमोल निनावे यांनी प्रबोधिनी वेब न्यूज मध्ये नागरिकांच्या समस्या मांडून वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर हेच वृत्त इतरही वर्तमानपत्रात प्रकाशित केल्या गेले. एक आठवडा लोटल्यानंतर नवरगाव येथील विनोद लोणीकर हे ग्रामपंचायतीचा कोणताही पदाधिकारी नसताना पत्रकार अमोल निनावे यांना फोन करून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली व निनावे यांची नाहक बदनामी केली.
अमोल निनावे पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका संपर्क प्रमुख आहेत. नवरगाव येथील विनोद लोणीकर यांच्या विकृत मानसिकतेने अमोल निनावे यांची सामाजिक मोठी मानहानी झाली आहे. हि बाब अत्यंत निंदनीय असून गैरवर्तणुकीची आहे. यामुळे लोणीकर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत व अश्लील शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे तसेच सामाजिक मानहानी करणे या कृत्या अंतर्गत भारतीय दंड संहिता कलमा अन्वये लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. सदर बाबीचे गांभीर्य लक्षात न घेता गुन्हा दाखल न केल्यास पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here