चामोर्शी : लखमापूर बोरी गावात रस्त्यात मोठं मोठे खड्डे पडले आहेत. ऐन पावसाळ्यात रस्त्याची वाताहत झाली आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना चांगलाच त्रास वाढला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मागणी करत रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. दिलीप सुरजगडे ते कारुजी शेंडे यांच्या घराकडे जाणार सदर रस्ता आहे.
गावातील लोकांच्या ये-जा करण्याकरिता हालअपेष्टा सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष नेमाजी घोगरे, राष्ट्रवादी युवक कार्यकर्ता अतुल भरसागडे, प्रितम घोगरे, नारायण पिपरे, दिलीप सुरजागडे, आनंदराव पीपरे, परशुराम वासेकर आदींनी या गंभीर समस्येचे निवेदन दिले आहे.मात्र वारंवारच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन प्रशासकीय विभागाकडे मागणी केली आहे.मात्र प्रशासनाकडून याकडे डोळेझाक केली जात आहे.यामुळे रस्ता बनवून देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली आहे
