बामणवाडा येथील विद्युत तार ठरतोय जीवघेणा विद्युत तारेच्या परिसरातील नागरिक दहशतीत प्रतिनिधी जिम्मेदारी पासून हात झटकले असल्याने नागरिक संतापले

0
198

बामणवाडा येथील विद्युत तार ठरतोय जीवघेणा

विद्युत तारेच्या परिसरातील नागरिक दहशतीत

प्रतिनिधी जिम्मेदारी पासून हात झटकले असल्याने नागरिक संतापले

राजुरा प्रतिनिधी
बामनवाडा येथील वार्ड नंबर 1 परिसरात नागरिकांच्या घरावरुन जिवंत विद्युत तारा गेली असल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आलेले आहे. घरावरून विद्युत तार गेली असल्याने मुलांना, महिलांना, पुरुषांना धोका निर्माण झाला असून तारेला हात लागेल अश्या स्थितीत विद्युत तार लोमकळत आहे. वास्तविक त्या विद्युत तारेची गरज नसूनही विद्युत विभाग तार काढण्यात कसुराई करीत असून अजूनही प्रशासन नागरिकांचे जीव जाऊ नये यासाठी कुठलेही प्रयत्न करताना दिसत नाही.

परिसरातील नागरिक कित्येकदा विद्युत तारेची जीवघेणी अडचण निदर्शनास आणून दिलेली आहे. मात्र एका ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी हा आमचा काम नाही असे सांगून जिम्मेदारी झटकली असून यामुळे नागरिक या पदाधिकार्‍यांवर संताप व्यक्त करीत आहेत.

आणि पुन्हा त्याच वॉर्डातून हे पदाधिकारी या निवडणुकीत उभी असल्याने त्या पदाधिकाऱ्याला धडा शिकवण्याचा चंग मतदारांनी बांधलेला आहे.

जीवघेण्या विद्युतधारेची अडचण सोडविण्या चा वचन दिलेल्या उमेदवाराला मतदान करणार असल्याचे नागरिक बोलून दाखवीत असले तरी प्रशासनाची नैतिक जिम्मेदारी असूने प्रशासनाने तात्काळ जीवघेणा विद्युत तार काढावा अन्यथा नागरिक आंदोलन करणार आहेत.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here