आ. किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून अमराई वार्डात नालीचे काम सुरु – महेंद्र बाग

0
598

आ. किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून अमराई वार्डात नालीचे काम सुरु – महेंद्र बाग

 

घुग्घुस येथील अमराई उडिया झोपडपट्टी वार्डातील बरेच वर्षांपासून नालीची समस्या होती. येथील हि बाब महेंद्र बाग यांनी लक्षात घेऊन त्वरित यंग चादा बिग्रेड अध्यक्ष तथा आ. किशोर जोरगेवार यांना स्वतः भेट देऊन अमराई उडिया झोपडपट्टी वार्डातील नालीचे बांधकाम होत नाही आहे, घाण जमा होते. घाणीमुळे वातावरण प्रदूषित होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे महेंद्र बाग यांनी सांगितले.

आ. किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडचे सहायक विलास वनकर यांना लवकरात लवकर नाली चे काम करण्यात लावा अशा सूचना दिल्या. यामुळे नालीचे बांधकाम तातडीने चालु करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ता महेंद्र बाग व आ. किशोर जोरगेवार यांचे आभार स्थानिकांनी मानले.

यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे विलास वनकर, महेंद्र बाग, कांता बाग, वनिता नियाल, सुतो बाग व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here