अल्ट्राटेक व्दारे बाखर्डी येथे गावतलाव चे भूमिपूजन

0
427

अल्ट्राटेक व्दारे बाखर्डी येथे गावतलाव चे भूमिपूजन

आवाळपूर । अल्ट्राटेक कम्युनीटी वेलफेअर फाऊंडेशन च्या वतीने बाखर्डी येथे गावतलाव चे भूमिपूजन अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे युनिट हेड, विजय एकरे, यांच्या मार्गदर्शनात, उपव्यवस्थापक संजय शर्मा व गावचे सरपंच अल्का पायपरे यांचे हस्ते करण्यात आले. गावतलाव निर्माण व्हावा याकरिता कर्नल दिपक डे यांनी प्रयत्नांची परिकाषा केली. यावेळी अल्ट्राटेक चे श्री.सतीश मिश्रा, संजय पेटकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक हरिभाऊ जेणेकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, ग्रामविकास अधिकारी, पारधी, ग्रा.पं सदस्य श्रीकांत राजूरकर, विनोद उरकुडे, बाळू बुचुंडे, गावातील नागरिक मेगराज पानघाटे, दिवाकर जेणेकर, अशोक मिसलवार, अल्ट्राटेक चे कंत्राटदार अरुण रागीट तथा गावकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता सचिन गोवारदीपे व देविदास मांदाळे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here