उद्यापासून सुरू होणाऱ्या श्री संत विदेही शंकर बाबा यांच्या 25 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मंदिराला भव्य आकर्षण रोषणाई व सजावट

0
444

उद्यापासून सुरू होणाऱ्या श्री संत विदेही शंकर बाबा यांच्या 25 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मंदिराला भव्य आकर्षण रोषणाई व सजावट

 

 

यवतमाळ, मनोज नवले
श्री संत विदेही शंकर बाबा यांचा उद्यापासून सुरू होणाऱ्या 25 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सकाळी सात वाजता महा अभिषेक व आठ वाजता महाआरती ला सुरूवात होणार आहे. चिखलगावचे आराध्य दैवत असलेले श्री संत शंकर बाबा यांचा उद्यापासून 25 वा महोत्सव साजरा होणार असून सर्व कोरोनाचे नियम पाळून सकाळी साडेपाच वाजता ध्यान पाठ सुभाष सामुदायिक प्रार्थना व सकाळी सात वाजता सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोनाचे सावट असल्यामुळे वणी तालुक्यातील चिखलगाव येथे सुरु होणाऱ्या श्री संत विदेही शंकर बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त कोणतेही कार्यक्रम न घेता 28 तारखेला आठ वाजता ह.भ.प तुगनायक महाराज यांचे संगीतमय प्रवचणाचे आयोजन करण्यात आले आहे.

29 तारखेला सकाळी 7:30 वाजता ग्रामसफाई, 9 ते 12 रांगोळी स्पर्धा व 3 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व श्री संत विदेही शंकर बाबा व कोरोना काळात मृत्युमुखी पावलेल्या सर्वच चिखलगाव व परिसरातील व्यक्तींना श्रद्धांजली कार्यक्रम नियोजित असून सायंकाळी 5 वाजता श्री संत विदेही शंकर बाबा यांच्या पालखी सोहळा संपन्न होणार आहे.

30 तारखेला म्हणजेच शेवटच्या दिवशी सकाळी 10 वाजता ह. भ. प डॉक्टर दामोदर पंत आवारी यांचे दहीहंडी व काल्याचे किर्तन तर रात्री 3 ते 9 भव्य महाप्रसादाचे आयोजन केले असून या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान कमिटी व सर्व सन्माननीय सदस्य व गावकऱ्यांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here