Ilकृतिशीलताll

0
626

Ilकृतिशीलताll
राजूरा (चंद्रपूर)-किरण घाटे- महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयाेजिका व रामपूर राजूरा निवासी सराेज हिवरे यांनी क्रूतिशीलता हा एक संक्षिप्त लेख शब्दांकित केला आहे ताे खास वाचकांसाठी देत आहाे . आपल्याला जी परिस्थिती प्राप्त झाली आहे. त्या परिस्थितीत जे श्यक्य असेल, ते करणे हा प्रत्येक कृतिशील व्यक्तीमधला एक महत्वाचा गुण आहे. अशी परिस्थिती असती तर मी तसं केल असतं तशी परिस्थिती असती तर अस केलं असतं !अशा जर तर च्या स्वप्नात अडकून न राहता, आपण “केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे “या वाक्याची आपल्या मनाशी गाठ बांधून आपण छोटी छोटी पाऊल जर उचलत गेलो, किंवा योग्य वेळेची आदर्श परिस्थितीची वाट न पाहता अथवा केवळ विचार किंवा चर्चा न करता,जर आपण प्रत्यक्ष कृती करत गेलो तर ही कृतिशीलताच आपल्याला जीवनात यशस्वी ठरते.
कृतिशीलता हा गुण जर प्रत्येकाने आपल्या अंगी अंगीकारला तर आपण ठरवलेल्या लक्ष्यापर्यंत यशस्वी पणे पोहचल्या शिवाय राहणार नाही. कारण विश्वातील एक मनुष्य जर कुठलं अशक्य कार्य करत असेल तर तुम्हीही ते अवश्य करू शकता. फक्त्त ते कार्य करत असतांना थोडं संयमानी आणि शांततेणे ते कार्य केले पाहिजे. आणि कोणतेही कार्य करत असतांना मनुष्यामध्ये अंlतरिक विश्वास असला पाहिजे. हा विश्वासच मनुष्यामध्ये जाणीवपूर्वक काही सकारात्मक बदल घडवून आणतो. आणि आपल्या हातून सकारात्मक कृती घडायला सुरवात होते.
अशक्य कार्य शक्य करत असतांना विंदा करंदीकर यांनी लिहिलेल्या खालील ओळी आठवाव्या…………………………
“असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानांचे लावुनी अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये,
आयुष्याला दयावे उत्तर l
नको गुलामी नक्षत्रlची,
भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतांनाही
चैन करावी स्वप्नांची ll ‘

🟠🟣सरोज वि. हिवरे सहजं सुचलं काव्यकुंज संयाेजिका
सहकार नगर, रामपूर, राजुरा जि.चंद्रपूर🟠

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here