अनेकांचा भिमशक्ती संघटनेत प्रवेश !

0
774

अनेकांचा भिमशक्ती संघटनेत
प्रवेश !
🟢🟤 चंद्रपूर🟡🟣 किरण घाटे🟤आज रविवार दि. ७मार्चला सायंकाळी ५वाजता चंद्रपुरातील हर्षित(मोनु) अजय रामटेके यांच्या अष्टभुजा वॉर्ड येथील निवासस्थानी पार पडलेल्या एका कार्यक्रमात भिमशक्ती संघटनेत अनेक कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तिने प्रवेश केला.
या वेळेस भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय लहानुजी दुर्गे,भीमशक्तीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नामदेवराव पिंपळे भीमशक्ती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष समिक्षाताई आसेकर उपस्थित हाेत्या .भीमशक्ती संघटनेची ध्येयधोरणे , तत्वे ,व कार्यपद्धती या वेळी वक्त्यांनी आपल्या भाषणांतुन पटवुन दिली. भिमशक्ती संघटनेला अधिक गतिमान करण्याच्या सुचना या वेळी उपस्थित कार्यकर्त्यानां करण्यांत आल्या.
महिला आघाडीच्या सदस्या अपेक्षाताई पिंपळे यांनी उपरोक्त कार्यक्रमात मोलाचे मार्गदर्शन केले .या शिवाय निखिल काटोले , हर्षित रामटेके , सचिन माहोरकर ,चंद्रशेखर चिताडे ,प्रकाश देशभ्रतार ,अक्षय बन्सोड यांची सुध्दा भाषणे झाली .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अजय रामटेके यांनी केले तर सदरहु कार्यक्रमाचे आयोजन साधनाताई रामटेके यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here