राजीव रतन कोविड रुग्णालयात आणखी २४ खाटांची व्यवस्था करा – आ .किशोर जोरगेवार

0
478

राजीव रतन कोविड रुग्णालयात आणखी २४ खाटांची व्यवस्था करा – आ .किशोर जोरगेवार

घुग्गुसच्या राजीव रतन कोविड रुग्णालयाची केली आ. जोरगेवारांनी आज पाहणी!
चंद्रपूर, किरण घाटे : घूग्गुस येथे कोरोना बाधीत रुग्णांसाठी वेकोलीतर्फे सुरु करण्यात आलेल्या राजिव रतन कोविड रुग्णालयातील सोयी सुविधांची आज (शुक्रवारला )आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी करत येथील उपाय योजनांचा आढावा घेतला. यावेळी येथे आणखी 24 खाटा वाढविण्यात याव्यात अशा सुचना चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी केल्या. कठीण काळात मदतीचा हात देत उत्तम उपायोजनां बाबत वेकोलिच्या अधिकारी कर्मचारी यांचे कौतूकही आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी वेकोली महाप्रबंधक उदय कावळे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आनंद, डाॅ. शंभरकर, सबेरीया मॅनेजर किसरोडी, क्षेत्रीय कार्मीक प्रबंधक ब्रिजेश कुमार, यांयासह यंग चांदा ब्रिगेडचे प्रेम गंगाधरे, राजीव नाथड यांची यावेळी उपस्थिती होती.
चंद्रपूर शहरासह घूग्गुूस येथेही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामूळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणात उपचारा करिता चंद्रपूरात येत असल्याने येथील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता तसेच रुग्णांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता घूग्गूस येथील वेकोलीचे राजीव रतन रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी सुुरु करण्यात आले आहे. दरम्यान आमदार जोरगेवार यांनी सदरहु रुग्णालयाला भेट देत येथील सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी येथील बेड, औषधसाठा, याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. सध्या 24 खाटांचे हे रुग्णालय असून यात वाढ करुन आणखी 24 खाटा उपलब्ध करुन घ्याव्यात अशा सूचना यावेळी आ. जोरगेवार यांनी अधिका-यांना दिल्या हे रुग्णालय घूग्घूस वासीयांसाठी आशेची किरण असून येथे येणा-या रुग्णांचे सामाधान होईल अशी व्यवस्था उभी करावी असे आमदार किशोर जोरगेवार या वेळी म्हणाले . रुग्णालयात स्वच्छता पाळणात यावी, रुग्णांना योग्य वागणूक देण्यात यावी, उपचार करत असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीबाबतची माहिती त्यांच्या नातलगांना देण्याची सोय उपलब्ध करण्यात यावी, यासह अनेक महत्वाच्या सुचना यावेळी आमदार जोरगेवार यांनी वेकोलि प्रशासनाला केल्यात. तसेच पाहणी दरम्यान येथील उत्तम नियोजना बाबत वेकोलि अधिका-यांचे कौतुकही केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील लसीकरण केंद्रालाही भेट देत लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत लस घेत असल्याबदल त्यांचे अभिनंदन केले. लस घेण्यासाठी येणा-या नागरिकांसाठीही योग्य व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना या भेटी दरम्यान त्यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here