कोरपना इथे गोंडवाना गणतंत्र पार्टी ची कार्यकारिणी बैठक संपन्न

0
381

कोरपना इथे गोंडवाना गणतंत्र पार्टी ची कार्यकारिणी बैठक संपन्न

 

कोरपना, नितेश शेंडे : शिवाजी महाविद्यालय इथे गोंडवाना गणतंत्र पार्टी ची कार्यकारिणी बैठक घेण्यात आली. या कार्यक्रमात गोंडवाना गणतंत्र पार्टी कोरपना तालूका अध्यक्ष पदी बंडूजी कूंभरे, मेजर कोरपना यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी महादेव पेन्दोर रामपूर, सचिव पदी राजेश सोनेराव सिडाम हिरापूर आणि संकेत कूळमेथे वडगाव यांची कोरपना तालूका प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. मंगेश पंधरे कोल्हापूर गूडा यांची प्रसिध्दी प्रमूख म्हणून निवड करण्यात आली. तालूका महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ, शिलाताई बाळकृष्ण पंधरे, ग्रामपंचायत, सदस्य कडोली, उपाध्यक्षा सौ छायाताई राजेंद्र कोडापे हिरापूर व शशीकला दंत्तू टेकाम आवाळपूर यांची महिला मोर्चा आघाडी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकारी यांना नियूक्ती पत्र व शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पांडुरंगजी जाधव आणि प्रदेश महासचिव अब्दुल जमीर अब्दुल हमीद व राजूरा तालुका अध्यक्ष अरून उदे, संजू सोयाम माथा, सुधाकर कूसराम आवाळपूर, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे कट्टर कार्यकर्ते प्रविण मडचापे, मंगेश सोयाम, संदिप पंधरे, मारोती पोटावी, मंगेश पंधरे उपस्थित होते. आभार प्रदर्शन संकेत कूळमेथे वडगाव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here