पत्रकार विजय केदारे यांच्या निवास स्थानावर हल्ला चढविणाऱ्या समाजकंटकावर कठोर कार्यवाही करा!

0
403

पत्रकार विजय केदारे यांच्या निवास स्थानावर हल्ला चढविणाऱ्या समाजकंटकावर कठोर कार्यवाही करा!

पुरोगामी पत्रकार संघ राजुरा यांची मागणी

मा. मुख्यमंत्री यांना ठाणेदार राजुरा मार्फत दिले निवेदन

राजुरा, (25 ऑगस्ट) : शासनमान्य पुरोगामी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष विजय केदारे यांच्या निवास स्थानावर हल्ला चढविणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन आज पुरोगामी पत्रकार संघ राजुरा तर्फे ठाणेदार राजुरा मार्फत मा. मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले.
सदर पत्रकार संघटना राज्यातील पत्रकार बांधवांच्या समाजातील घडणाऱ्या अत्याचार व अन्यायाच्या विरोधात काम करणारे संघटन म्हणून राज्यभर कार्यरत आहे. पत्रकार विजय केदारे यांनी दैनिक जनमत मराठी वृत्तपत्रातून अन्याय विरोधात वाचा फोडणारी बातमी प्रकाशित केली होती. त्याचाच राग मनात ठेवून येथीलच काही स्थानिक समाज कंटकांनी पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच दैनिक जनमतचे प्रतिनिधी केदारे यांच्या निवासस्थानावर त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला चढवीला व नाहक मानहानी केलेली आहे.
अशा हल्लेखोर समाज कंटकावर ताबडतोब कठोर कार्यवाही करून पुरोगामी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष विजय केदारे यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी संघाचे तालुका संपर्क प्रमुख अमोल राऊत, तालुका संघटक आनंदराव देठे, आशिष यमनूरवार, अंकुश भोंगळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here