ट्री कटिंग करायला गेलेल्या महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याला शीविगाळ करत दिली जिवे मारण्याची धमकी

0
1143

ट्री कटिंग करायला गेलेल्या महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याला शीविगाळ करत दिली जिवे मारण्याची धमकी

अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच्या शासकीय कामात केला जाणीवपुर्वक अडथळा

राजुरा/प्रतिनिधी : सध्या अधूनमधून येणाऱ्या जोरदार हवेमुळे घरगुती वीज जाण्याच्या अनेक घटना घडत आहेत. याकरिता वीज विहिनी ताराजवळ असलेले वृक्षाच्या फांद्या वीज विभागाकडून तोडण्यात येत आहेत. वीज पूरवठा खंडित होण्यास अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी गेलेल्या वीज अधिकारी व कर्मचारी यांना उच्च शिक्षित कुटुंबियांकडून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सामाजिक जाणिव जपणाऱ्या व सुशिक्षित कुटुंबीय यास सहकार्य करण्याची अपेक्षा होती मात्र तसे घडता याउलट भूमिका घेत शासकीय कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या कुटुंबियांविरोधात पोलीस ठाणे राजुरा येथे वीज वितरण प्रशासन अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक ५ मे रोजी राजुरा येथील बामनवाडा परीसरातील तक्षशीला नगर येथिल लघु दाब (L/T) विद्युत वाहिनीवर, काही झाडे लागून विज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार राहुल वासेकर कार्यरत लाईनमन यांच्या लक्षात आला. तशी माहिती त्यानी साहाय्यक अभियंता यांना दिली. ट्री कंटिग कामादरम्यान विद्युत वाहिनीला लागत असलेल्या फांद्या कापणे घेण्यात आली. परंतु तक्षशीला नगर येथील निवारण कांबडे (शिक्षक) यांचा मोठा मुलगा श्रिनिल कांबडे व लहान मुलगा प्रसंजित कांबळे हे वरिष्ठ तंत्रज्ञ विलास बनकर, सह लाईनमन राहुल वासेकर व साहाय्यक अभियंता ठमके साहेब यांच्या अगांवर धावून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच अर्वाच्य भाषेत शीविगाळ करुन ट्री कंटिग करण्यास मनाई केली.
त्यामुळे राजुरा येथील महावितरण कंपनीच्या कर्मचारयांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या अगोदर सुद्धा ७ मार्च २०२१ रोजी संजय लांडे लाईनमन यांच्या घरावर काही लोकांनी रात्रो हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देत घराची तोडफोड सुधा केली होती.
अश्या प्रकरणाचा विचार केल्यास महावितरण कंपनीचे कर्मचारी सुरक्षित नाहीत. त्यामुळे अश्या हलेखोरांवर लवकरात लवकर गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी अशी मागणी राजुरा येथील महावितरण कंपनीचे कर्मचारी करीत आहेत. त्वरीत अटक करून गुन्हा न नोंदवल्यास सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा राजुरा येथील महावितरण कंपनीचे कर्मचारी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here