वाढता संसर्ग – दिवसभरात ३ मृत्यू १०६ पॉझिटिव्ह ९४ जणांची कोरोनावर मात
कोरोनाचे रुग्ण ४ हजार पार

अनंता वायसे
वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. दररोज शेकडो नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात समोर येत आहे. कोरोना संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच रविवार २७ सप्टेंबर रोजी दिवसभरात जिल्ह्यात नव्याने १०६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा चार हजार पार करून ४२५८ वर पोहोचला आहे तर दिवसभरात ३ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात समुद्रपूर येथील ५० वर्षीय पुरुष.हिंगणघाट येथील ६५ वर्षीय महिला.व आष्टी येथील ६९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर गेल्या चोवीस तासात ९४ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर नव्याने आलेल्या १०६ जणांमध्ये ६९ पुरुष. ३७ महिला. असून यात वर्धा ६० (पुरुष ३८ महिला २२). देवळी ७ (पुरुष ६ महिला १). सेलू १२ (पुरुष ६ महिला ६). आर्वी ३ (पुरुष २ महिला १). कारंजा १ (पुरुष १.) .हिंगणघाट १६ (पुरुष १० महिला ६). समुद्रपूर २ (पुरुष १ महिला १).
….. कोरोना स्थिती ….
●आजचे रुग्ण……… १०६
●आजचे कोरोनामुक्त.. ९४
●आजचे मॄतक………… ३
●एकूण रुग्ण ……….४२५८
●एकूण कोरोनामुक्त ..२२००
●एकूण मॄतक ………..११४
●एकूण अॅक्टिव्ह रुग्ण..१९४३