अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेत पिकांचे पंचनामे करा

0
843

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेत पिकांचे पंचनामे करा

युवा संकल्प संस्था ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राहुल वैरागडे यांची मागणी

गडचिरोली, सुखसागर झाडे
भेंडाळा/चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अवकाळी पाऊस पडत असल्यानेधान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी युवा संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वैरागडे यांनी केली.

अवकाळी पावसाने धान्य पीक कोसळून ते पळून जाण्याची शक्यता दिसत आहे. धान पिकाचे काही दाणे पावसाने भिजून काळसर पडल्याने बाजारपेठेमध्ये या दानाला व्यापारी घेण्यास नकार देतात. अशा परिस्थितीमध्ये काही व्यापारी कर्जबाजारी शेतकऱ्यांचा फायदा घेतात. कवडीमोल भावाने धान्य खरेदी करतात.

धान विकलेल्या पैशाने शेती खर्च करून निघणे ही कठीण होतं आहेत. नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान कापून ठेवलेल्या सरड्या दोन – तीन वेळा ओल्या झाल्या. परिणामी धान पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे संबंधित विभागाने शेतात पिकाची पाहणी करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी युवा संकल्प संस्था ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष राहुल वैरागडे यांनी केली आहे.

आजच्या महागाईच्या काळात शेतीवरील खर्च वाढल्यामुळे आणि शेतमालाला अत्यल्प भाव यामुळे शेती करणे नुकसानीचे ठरत आहे. गडचिरोली जिल्ह्यात दिनांक १२ व १४ नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस पडल्यामुळे उभे धान पीक व कापून असलेल्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धानाच्या सरड्या पाण्यात भिजल्यामुळे दाणे काळपट पडल्याने व्यापारी वर्ग धान खरेदी करताना धान्य रगडा करून तांदूळ बघतो तेव्हा पाकळ काढतो व कवडी मोल भावाने धानाची मागणी करतो, योग्य भाव मिळत नाही, नाइलाजास्तव शेतकऱ्यांना बेभावाने धान्य बाजारपेठेत विक्री करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असते. त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळाल्यास शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळावा या हेतूने शेतीचा पंचनामा करावे अशी मागणी युवा संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वैरागडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here