ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याने कार्यालयीन व विकास कामकाजाचा बट्याबोळ

0
917

ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याने कार्यालयीन व विकास कामकाजाचा बट्याबोळ

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या कडे निवेदन केले सादर

गडचिरोली जिल्ह्यातील समस्त ग्रामसेवकांनी मुख्यालयी हजर राहावे – आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आवाहन

चामोर्शी, सूखसागर झाडे : चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत सोनापुर येथील ग्रामसेविका एन. बी. निमगडे ग्रा. पं. कार्यालयात गैरहजर राहत असल्याने विकास कामांचा खोळंबा होत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना विषाणू उद्रेक बघता गावातील स्वच्छता, नाली उपसा, पाणी पुरवठा, फवारणी, लसीकरण व इतर विषयाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांचा समन्वय असणे गरजेचे आहे परंतू स्थानिक ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक अनुपस्थित राहिल्याने अनेक कामांचा खोळंबा होत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे असे आमदार डॉ देवराव होळी यांनी प्रतिपादन केले व गडचिरोली जिल्ह्यातील समस्त ग्रामसेवक यांनी मुख्यालयी हजर राहावे असे आव्हान केले.
आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात ग्रामपंचायत सोनापुर येथील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी आमदार डॉ देवराव होळी यांची भेट घेऊन येथील ग्रामसेविका श्रीमती. एम.बी. निमगडे ग्रामपंचायत कार्यालय सोणापुर येथे सतत अनुपस्थित राहिल्याने
समस्त कामांचा खोळंबा होऊन खूप त्रास सहन करावा लागत आहे तसेच नव्याने निवडणूक होऊन नवीन ग्रामपंचायत येथे नवीन सदस्य विराजमान झाले परंतु ग्रामसेवक यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात झालेले व्यवहार व विकास कामांचा आढावा अजूनपर्यंत दिलेला नाही.
ग्रामपंचायत कार्यालयात सतत गैरहजर राहत आहेत तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता कामे करने तसेच मागील सभेतील कोणत्याही विषयांना कोणतेही चालना दिल्या जात नाही त्यामुळे व सर्व विषयाची चौकशी करून कारवाई करावी व नवीन ग्रामसेवक ग्रामपंचायत सोनापुर येथे द्यावे अशे निवेदन देवून मागणी येथील सरपंच उपसरपंच व पदाधिकारी यांनी केली आहे.

सदर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने ग्रामसेविका एन. बी. निमगडे यांच्या इम्पॅक्ट 24 प्रतिनिधी चे प्रतिनिधीनी दुरध्वनी वरून संवाद साधला असता त्यांनी म्हटले की माझ्या वर लावलेले आरोप चुकीचे आहेत. माझी प्रकृती बरी नसल्याने मी सुट्टीचा अर्ज हा प्रभारी संवर्ग विकास अधिकारी पं. स. चामोर्शी व ग्रा.पं. पदाधिकारी सोनापुर यांचेकडे व्हाटसअॅप केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here