देशीदारूसह 6 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त, राजुरा पोलिसांची धडक कारवाई

0
805

देशीदारूसह 6 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त, राजुरा पोलिसांची धडक कारवाई

राजुरा, 5 ऑगस्ट (अमोल राऊत) : आज पहाटेच्या दरम्यान मुखबीरच्या ख़बरेवरुन मौजा पेलोरा फाटा येथे नाकेबंदी करुन प्रोव्हि, रेड केला असता एकुण 750 नग रॉकेट संतरा देशी दारू 180 मिली ने भरलेल्या प्लास्टिकच्या सीलबंद शीश्या कीमत 1,50,000/- रुपये व एक जूनी वापरती सिल्वर रंगाची टाटा सूमो क्रमांक एम एच 34 एए 0822 कीमत 5,00,000/-रुपये व आइटेल कंपनीच्या सिल्वर काळ्या रंगाचा आइडिया सिम असलेला मोबाईल कीमत 5000/-रुपयेचा असा एकूण 6,55,000/-रुपयेचा मुद्देमाल राजुरा पोलिसांनी ताब्यात घेतला. सदरचा गुन्हा नोंद करुन मुद्देमाल तपासात घेतला.
यवतमाळ जिल्ह्यातील दारू तस्कर शेख रहेमान शेख (42) रा. मोमीनपुरा वॉर्ड क्रमांक 11 वणी या आरोपीस अटक करण्यात आली. सदरची कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नरेन्द्र कोसुरकर यांचे नेतृत्वात डीबी पथकातील पोलिस हवालदार रविन्द्र नक्कनवार, नापोशी हेमंत बावने यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here