संघटनेच्या प्रयत्नाला आले यश!

0
711

संघटनेच्या प्रयत्नाला आले यश!

राष्ट्रीय आराेग्य अभियान कर्मचारी वर्गात पसरले आनंदाचे वातावरण  
चंद्रपूर, किरण घाटे : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी गेल्या 10 ते 12 वर्षांपासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर कार्यरत होते वेतन वाढीकरीता संघटने मार्फत सतत पाठपुरावा व लढा सुरू होता त्यांचे प्रयत्नाला यश येऊन एप्रिल 2018 पासून वेतन सुसूत्रीकरण नुसार कर्मचाऱ्यांना मानधन वाढ व मानधन वाढीचा फरक देण्या संदर्भात माहे ऑक्टोबर2020 मध्ये पत्र प्राप्त झाले आहे. तात्काळ कार्यवाही करून सदरहु मानधन वाढीच्या फरकाची रक्कम अदा करावयाची होती . परंतु राज्यस्तरावरून अनुदान उपलब्ध नसल्याने फरक अदा करता आला नाही. आज कोरोना सारख्या या महामारीत सुद्धा अभियानातील कर्मचारी न डगमगता कार्यरत आहे. बरेच कर्मचारी व त्यांचे परिवारातील सदस्यगण सुद्धा पाँझिटीव्ह येत अाहे आज या कोविड योध्याना पैशाची नितांत गरज आहे. या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचेशी संघटने मार्फत चर्चा करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून ज्या मागणीची कर्मचारी आतुरतेने वाट पाहत होते ती मागणी आज पूर्ण झाली आहे तदवतचं सर्व कर्मचाऱ्यांचा (चंद्रपूर जिल्ह्याचा)एरिअर्स आज त्यांचे बँके खात्यात जमा करण्यात आलेला आहे. मागणीची पुर्तता झाल्यामुळे कर्मचाऱी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन.राकेश नाकाडे राज्य उपाध्यक्ष यांचे सह राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी अधिकारी समन्वय समितीने जिल्ह्यातील जि.प.च्या सर्व वरिष्ठ अधिका-यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here