ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी प्रमोदभाऊ भगत यांची निवडविदर्भ अध्यक्ष पदावर दिगांबर भाऊ धानोरकर विराजमान
सर्व स्तरावरून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव
चामोर्शी, सुखसागर झाडे : आज 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ग्राम संवाद सरपंच संघाची स्थापना करण्यात आली. या संघाचा मुख्य हेतू असा आहे की, संपूर्ण महाराष्ट्रातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य हे एकत्रित येवुन मागर्दशन करणे, विचारांची देवाणघेवाण करने. आपले अधिकार, जनतेची काम, शासकीय योजना व गावविकास या सर्व अडचणींवर मात करून विकास साधन्यासाठी, ग्राम सवांद, सरपंच संघ महराष्ट्र ही संघटना तयार करण्यात आली. ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी मा. प्रमोदभाऊ भगत लोकाभिमुख धडाडीचे सामाजिक तथा राजकीय कार्यकर्ता माजी पं.स. सदस्य अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना चामोर्शी यांची निवड झाली. तर ग्राम संवाद सरपंच संघ विदर्भ अध्यक्ष पदी सर्वांचे लाडके मनमिळाऊ स्वभाव वृत्तीने जनसामान्यांच्या ह्रृदय्यात स्थान मिळवलेले लोकप्रिय माजी सरपंच मान. दिगांबर भाऊ धानोरकर ग्रा. पं. उपसरपंच वेलतुर तुकूम यांच्या निवडीचे सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.