स्थानिक आमदार व पंचायत समिती सदस्य निधीतून सत्तर लक्ष रुपयांचे भरीव विकास कामांचे भूमिपूजन

0
473

गडचिरोली तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास

 

गडचिरोली .प्रतिनिधी/सुखसागर  झाडे :- गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायत पोर्ला ,येथे व ग्रामपंचायत काटली अंतर्गत नगरी व ग्रामपंचायत नवरगाव येथे गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या स्थानिक आमदार निधीतून पन्नास लक्ष रुपयांचे विविध विकास कामांचे व स्थानिक पंचायत समिती सदस्य सभापती विलास दशमुखे यांच्या स्थानिक विकास निधीतून एकोनवीस लक्ष रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून सदर विकास कामे प्रलंबित होते परंतु येथील पंचायत समितीचे उपसभापती विलास पाटील दशमुखे यांच्या प्रयत्नामुळे सदर समस्त कामे आता लवकरच पूर्णत्वास येईल..

सदर कामांपैकी मौजा पोर्ला येथील इंदिरा गांधी चौक ते इसाम्या पर्यंत सिमेंट काँक्रिट रोड बांधकाम किँमत दहा लक्ष रुपये सराड ते जांभूळ घाट येथे चार स्लॅब ड्रेन व मुरूम टाकणे बारा लक्ष रुपये मौजा नगरी येथील एकनाथ बांबोळे ते पुंजाराम गेडाम यांच्या घरा पर्यंत सिमेंट काँक्रिट रोड बांधकाम करने जिल्हा परिषद शाळा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे एक लक्ष रुपये नवरगाव येथे ग्रामपंचायत समोरील सिमेंट काँक्रिट रोड बांधकाम, आरो कुलिंग मशीन लावणे एक लक्ष रुपये मौजा वसा येथे आनंद धानोरकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता सिमेंट रोड बांधकाम करने 1,5 लक्ष रुपये मौजा काटली येथे भक्तदास चापले ते हरिदास मानकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड बांधकाम करणे व ईतर कामे असे एकूण साठ लक्ष रुपयांचे बांधकाम येथील पंचायत समिती सभापती विलास पाटील दशमुखे यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आले व भूमिपूजन आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले..

यावेळी प्रामुख्याने पंचायत समितीचे सभापती मारोतराव ईचोडकर उपसभापती विलास दशमुखे व काटली येथील सरपंच उंदिरवाडे उपसरपंच सौ, खेडेकर व मौजा नगरी येथील सरपंच नागेश्र्वरी तीवाडे उपसरपंच सतीश बारसागडे ,ग्रामसेवक पानेमवार ,मुख्याध्यापक राजेंद्र घुगरे मौजा नवरगाव येथे सुनंदा दशमुखे उपसरपंच आशा भोयर ग्रामसेवक सहारे , मौजा पोर्ला येथे सरपंच निवृता राऊत , ग्रामपंचायत सदस्य मुकरू लाडवे,अनिल चापले लोमेश कोलते शुभम दशमुखे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here