नांदगाव पोडे शाळेतिल गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वगृही सत्कार

0
508

नांदगाव पोडे शाळेतिल गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वगृही सत्कार

 

 

स्व. गोपाळराव वानखेडे विदयालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव पोडे तालुका बल्लारपूर येथील इयत्ता 12 वि कला शाखेचा निकाल 100% असून कॉलेज मधून गौरव मोरे 77.67 टक्के गुण घेऊन प्रथम आला. कु. पूजा आंबिलकर 72 द्वितीय तर कु .सेजल पांदे 71.50 टक्के गुण घेऊन तृतीय आली.

 

कला शाखेतून एकूण 60 नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 60 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100% निकालाची परंपरा कायम ठेवली. यामध्ये प्राविण्य श्रेणी 1, प्रथम श्रेणी 23, द्वितीय श्रेणी 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयातर्फे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्वगृही जाऊन विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या जाता. यावर्षी सुद्धा गुणवंत विद्यार्थी गौरव मोरे, कु.पूजा अंबिलकर, कु. सेजल पांदे यांचा शाळेचे राज्य पूरस्कार प्राप्त प्राचार्य नरेंद्र बोबडे, गावातील सामाजिक कार्यकर्ते पिंटू देउळकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे उपस्थितीत गुणवंतांचा स्वगृही सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छ दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here