कर्मचा-यांचे प्रेम विसरणे अशक्य : तहसिलदार डाँ. रविन्द्र हाेळी

0
465

कर्मचा-यांचे प्रेम विसरणे अशक्य : तहसिलदार डाँ. रविन्द्र हाेळी

किरण घाटे

राजूरा महसुल कर्मचा-यांनी दिलेले प्रेम मी कधीही आपल्या आयुष्यात विसरु शकरणार नाही असे भावनिक उदगार महसुल विभागाचे तहसिलदार डाँ . रविन्द्र हाेळी यांनी व्यक्त केले . ते काल महसुल कर्मचारी वर्गा तर्फे (बदली निमित्त) आयोजित एका निराेप समारंभ कार्यक्रमात बाेलत हाेते .त्यांचे भरीव व उल्लेखनिय कार्या मुळे हा तालुका नेहमीच महसुल कामात जिल्ह्यात अव्वल राहीला असल्याचे त्यांनी या वेळी आवर्जुन सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभीच प्रभारी तहसिलदार डॉ. सचिन खंडाळे नायब तहसिलदार काळू, नायब तहसिलदार बन्सोड, सेवानिवृत्त ना. तहसिलदार वानखेडे यांचे वतीने शाल , श्रीफळ भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन डाँ हाेळी यांचा सत्कार करण्यात आला. तलाठी विनोद गेडाम विनोद खोब्रागडे , गोहने ,चिडे, रामगिरवार, गोरे (मंडळ अधिकारी ), सुनील रामटेके खांडळे ,आक्रोश लिगायत, आदिनी या वेळी आपल्या अल्पश्या भाषणातुन डाँ. हाेळी यांचे कार्यावर प्रकाश टाकला. डाँ. रविन्द्र हाेळी यांनी आपल्या कार्य काळात निवडणूक कामे व्यवस्थित रित्या पार पाडणे पांदण रस्ते खुले करणे. अवैध रेती माफीयावर वचक ठेवणे. शासकीय वसुलिचे उद्दीष्ट पुर्ण करणे, अतिक्रमण हटविणे कोरोना काळात महत्त्वाची भुमिका निभवणे, या सारखी अनेक महत्त्वांची कामे पार पाडली. कार्यक्रमाचे संचालन सोनाली लांडे यांनी केले. सदरहु कार्यक्रमात वकील मंडळी तर्फे डाँ. हाेळी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तलाठी संघटना, शिपाई संघटना, कोतवाल संघटनाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात सर्वांनी मास्क, फिजिकल डिस्टिंगचे अंतर व नियमाचे पालन केले असल्याचे प्रत्यक्षात दिसुन आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here