नाभिक युवा आघाडी तर्फे संत श्री नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

0
444

नाभिक युवा आघाडी तर्फे संत श्री नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी : नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी च्या वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नगाजी महाराज यांची २५५ वी पुण्यतिथी व ब्रम्हपुरी येथील पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ आणि रुग्णसेवा, रक्तदान शिबिर, बाइक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन २२ आक्टोंबर रोज शुक्रवार ला श्री संत नगाजी महाराज देवस्थान कहाली खंडाळा रोड ब्रम्हपुरी येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक महादेव शेंडे असुन प्रमुख पाहुणे म्हणून ब्रम्हपुरी नगर परिषद चे उपाध्यक्ष अशोक रामटेके,नगरसेवक विलासराव विखार, नितीन उराडे, हितेंद्र राऊत, राकेश कराडे, दिपक शुक्ला, महेश भर्रे, गौरव भैय्या, प्रितेश बुरलेन, सतीश हुमणे, मनोज वठे, सागर आमले आदिंची उपस्थिती राहणार आहे.

महोत्सव दिनी ब्रम्हपुरी येथील सर्व सलुन दुकान बंद राहतील. प्रस्तुत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी तर्फे अध्यक्ष विलास सुर्यवंशी,अजय खळशिंगे, विलास दाणे, पितांबर फुलबांधे, गोलु फुलबांधे, मयुरभाऊ मेश्राम, लक्ष्मण मेश्राम, श्रावन येळणे व सदस्य गण यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here