वाघाच्या हल्यात ठार झालेल्या कुराडी येथील महीलेच्या कुंटुबाला शिवसेनेतर्फे आर्थिक मदत

0
440

वाघाच्या हल्यात ठार झालेल्या कुराडी येथील महीलेच्या कुंटुबाला शिवसेनेतर्फे आर्थिक मदत

वनविभागाने ताबडतोब पिडीत कुंटुबाला आर्थिक मदत करावी व वाघांचा बंदोबस्त करावा

सुखसागर झाडे:- वडसा वनविभागाअंतर्गत गडचिरोलीला लागुन असलेल्या कुराडी गावातील महीला सिंधुबाई दिवाकर मुनघाटे वय 55 ही गावातील काही महीलांसाेबत जंगलात तेंदुपत्तासीजनचे कामात राेजगारावर गेली असता जवळच दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करुन ठार केले. त्यामुळे मुनघाटे परीवारावर दुखाचे डोंगर कोसळले.ही बाब लक्षात येताच जिल्हा संपर्क प्रमुख मा.किशाेर पाेतदार यांचे सुचनेनुसार शिवसेनेचे जिल्हा समन्वयक श्री. सुनिलभाऊ पोरेड्डीवार व मा.उपजिल्हा प्रमुख वासुदेवभाऊ शेडमाके यांनी पूढाकार घेऊन कुराडी गावात जावुन मुनघाटे परीवाराला आर्थिक मदत केली.व त्याच्या कुटुंबाचे सांत्वन केलेत.यावेळी कुराडी गावाचे सरपंच श्री.प्रमोद मुनघाटे शिवसेनेचे श्री. नरेश चुटे, प्रविण रामगीरवार प्रामुख्याने हजर होते. स्व. सिंधुबाई मुनघाटे यांचे मुले लंकेश व सचिन व त्यांचे पती श्री.दिवाकर मुनघाटे तसेच गावातील नागरीक प्रामुख्याने हजर होते.
मुनघाटे कुटुंबाची परीस्थीती अत्यंत हलाखीची असुन वनविभागाने लवकरात लवकर पिडीत कुंटुबाला आर्थिक मदत करावे व याकरीता सर्वताेपरी पाठपुरावा करन्याचे आश्वासन श्री. सुनिल भाऊ पोरेड्डीवार व वासुदेवभाऊ शेडमाके यांनी दिले तसेच वनविभागाने पुढाकार घेऊन लवकरात लवकर या भागातीत वाघांचा बंदाेबस्त करावा जेनेकरुन पुन्हा अशी घटना घडु नये .अन्यथा शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदाेलन करन्यात येईल अशी ताकीद देन्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here