विरकुंड गोडगाव इजासन परसोडा व कायर परिसरात वाघाची दहशत नागरिक भयभीत

0
679

विरकुंड गोडगाव इजासन परसोडा व कायर परिसरात वाघाची दहशत नागरिक भयभीत

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले 

गेल्या काही दिवसापासून वणी तालुक्या सोबत विरकुंड गोडगाव इजासन परसोडा व कायर परिसरात वाघाने चांगलीच दहशत पसरवली आहे.
या वाघाच्या दहशतीमुळे येथील नागरिक बेजार झाले आहे त्यातच गोडगाव येथील अनिल शंकर दोरखंडे यांच्या गायीवर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना घडली आहे.

या परिसरात वाघाचा मुक्त संचार असून गेल्या काही महिन्याआधी गोडगाव येथील पशुपालकाच्या गुरा ढोरांना वाघाने ठार केल्याच्या घटना घडली. व काही दिवसा अगोदर विरकुंड शेतसीवारात वाघीण व शेताऱ्याची आमने सामने नजारानजर झाली.मात्र वाघणे डरकाळी फोडल्या नंतर शेतकरी थेट झाडावर चढला त्यामुळे त्याचे सतर्कतेने काही अनुचित घटना घडली नाही.
सोबतच इजासन गोडगाव परसोडा या गावातील शेतकऱ्याची वावरे(शेती) ही जंगलालगत असल्याने वाघ दररोज शेतकरी शेतमजूर शेरकी ढोरकी यांना आढळत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या शेतकऱ्याच्या शेतामधील कापुस वेचणी आणि शेतातील सोयाबीन काढण्याचे लगबग चालु आहे मात्र वाघाच्या भितीमुळे शेतकऱ्यांना शेतमजुर मिळणे कठीण होत आहे वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एखादा मानवी बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे म्हणून वनविभागाने तात्काळ वाघाचे बंदोबस्त करावे अशी मागणी गावकरी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here