मोक्षधाम पुलावरून एकाची आत्महत्या : दोन दिवसांपूर्वी झाली होती कारागृहातून सुटका

0
621

मोक्षधाम पुलावरून एकाची आत्महत्या : दोन दिवसांपूर्वी झाली होती कारागृहातून सुटका

 

 

वणी (यवतमाळ), मनोज नवले : शहरातील मोक्षधाम येथील पुलावरून निर्गुडा नदीत आत्महत्या केल्याचा संशय निर्माण झाला आहे. आत्महत्या करणारा इसमाबाबत संशय आहे की, त्यानेच नदीत उडी घेतली की नाही. कारण त्याचे कपडे व चप्पल पुलावर मिळून आली आहे.

 

 

फय्याज अली अजगर अली रा. मैल खड्डा ( रंगनाथ नगर) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. या इसमाने सायंकाळच्या सुमारास वणीच्या मोक्षधाम जवळच्या पुलावरून उडी घेतल्याचा संशय आहे. सदर व्यक्तीचे कपडे व चप्पल पुलावर ठेऊन असल्याने कदाचित त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा असा तर्क लावल्या जात आहे. दोन दिवस अगोदरच त्याची कारागृहातून सुटका झाली असल्याची माहिती आहे. 21 सप्टेंबर मंगळवारी पाऊस अधिक झाल्याने नदी दुथडी भरून वाहत होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. फय्याज याचा शोध सुरू आहे. वृत्त लिहितपर्यत फय्याज चा थांगपत्ता लागला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here