अबब…!!! ग्रामपंचायत सदस्याचा घरातच शिरले पाणी

0
470

अबब…!!! ग्रामपंचायत सदस्याचा घरातच शिरले पाणी

वणी (यवतमाळ), मनोज नवले : तालुक्यात कालपासून संततधार पावसाला सुरुवात झाल्याने मंगळवारच्या सकाळपासून संततधार पाऊस असल्याने विश्रांतीचे नावच नाही. अशा परिस्थितीत वणी तालुक्यातील राजूर कॉलरी या गावातील पटांगणाला नदीचे रूप धारण झाले असून येथील संपूर्ण पाणी राजूरच्या वॉर्ड क्रमांक 3 व 4 मध्ये असलेल्या गावकऱ्यांच्या घराघरात टोंगळ टोंगल पाणी शिरल्याने भयभीत झालेल्या गावकऱ्यांनी अक्षरशः रात्र जागून काढली आहे. या संततधार पावसामुळे गावातील वॉर्ड क्रमांक 3 व 4 येथील संपूर्ण घराघरात पाणी पोहचल्याने घरातील अन्न धान्य, कपडे, लत्ते, इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतरही बाबीचे नुकसान झाले आहे. कारण राजूर गावात सांडपाणी वाहून जाण्यासाठी मोठे नाले आहेत ते तुडुंब भरून वाहू लागल्याने त्यातील पाणी पटांगणावर साचून व संततधार पावसाने संपूर्ण पाणी गावात शिरल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त होऊन गावकरी परेशान झाले आहे.

 

 

त्यातल्या त्यात ग्रामपंचायत सदस्यांच्या घराघरात पाणी शिरल्याने सदस्य सुद्धा हैराण आहे. तेव्हा ग्रामपंचायत सरपंच विद्या पेरकावार यांनी गावाची पाहणी करून तात्काळ गावातील पाणी काढण्यासाठी जेसीबी बोलावून त्याच्या सहाय्याने मोठी नाली खोदून पाण्याचा विसर्ग करण्याच्या निर्णय घेतला आहे. या गावाला नदी नाल्याच्या धोका नसतांनाही त्यांना संततधार पावसाचा फटका बसला आहे .त्यामुळे गावकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण होऊन हाहाकार उडाला आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी सरपंच विद्या पेरकावार ,ग्रामसेवक व सदस्य आहे.

 

 

“या आधीही गावातील प्रशासनाला माहिती दिली होती कि, गावात सांडपाणीने घरा घरात पाणी जाण्याची शक्यता आहे. त्याकरिता रेल्वे लाइनच्या बाजूला उपाययोजना लवकरात लवकर करावे परंतु प्रशासनाने काही केले नाही त्याने आज ही परिस्थिती आपणास दिसून येत आहे.” – ओम चिमुरकर, सदस्य ग्रा.पं. राजूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here