कोरपना ग्रामीण रुग्णालयला माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडून सॅनिटायझर मशीन भेट

0
486

कोरपना ग्रामीण रुग्णालयला माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडून सॅनिटायझर मशीन भेट

माजी आमदार अँड संजय धोटे यांचा पुढाकार

कोरपना तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव बघता,कोरपना तसेच परिसरातील तापाची मोठ्या प्रमाणात साथ सुरू आहे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे, त्याअनुषंगाने ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे माजी आमदार अँड संजय धोटे मार्फत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे भाजपा शाखा अध्यक्ष अनिल कवरासे यांनी सॅनिटायझर मशीनची मागणी केली होती,माजी आमदार अँड संजय धोटे यांनी पुढाकार घेत ही मागणी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे केली,व त्यांनी लगेच ही मागणी पूर्ण करून दिली,

ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे येणाऱ्या रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येणाऱ्या रुग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही या उद्देशाने तसेच नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने प्रतिबंध उपयोजना मनुन कोरपना ग्रामीण रुग्णालयला सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपा तालुका कोरपना येथील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार अँड संजय धोटे यांचे आभार मानले,तसेच दिनांक 20 मे 2021 ला सॅनिटायझर मशीनचा लोकार्पण भाजप जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर,डॉ पूरी,डॉ घाटे,भाजपचे शहर अध्यक्ष अनिल कवरासे,तुळशीराम डोहे,विलास पारखी,निवृत्ती डोहे,ज्ञानेश्वर मडावी,धोंडू उईके,ज्ञानेश्वर देरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्गानी तसेच परिसरातील नागरिकानी आनंद व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here