गोंडपिपरीतील कुलथा घाटावर रेती माफियांचा तांडव

0
511

गोंडपिपरीतील कुलथा घाटावर रेती माफियांचा तांडव

तहसीलदारांमार्फत धडक कारवाही
पाच ट्रॅक्टर जप्त

गोंडपिपरि(सूरज माडुरवार)

गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा व अंधारी नदी घाटावर लाकडाउनची संधी साधत रेती माफियांचा धुमाकूळ मागील महिनाभरापासून सुरू होता.गुप्त माहितीच्या आधारावर तहसीलदार के डी मेश्राम यांनी दि.२० गुरुवारी कूलथा घाटावर धाड टाकून तेथून चार तर गोंडपिपरी शिवाजी चौकात एक अशा पाच ट्रॅक्टर जप्त करून गोंडपिपरी पोलीस ठाण्यात जमा केले.
लाकडाउनच्या काळात संचार बंदी व जमावबंदी लागू असताना प्रशासन अन्य कामात व्यस्त असल्याची संधी साधत गोंडपिपरी तालुक्यात रेती माफिया कडून कहर सुरू होता याबाबत प्रसिद्धी माध्यमाने ने वारंवार पाठपुरावा करून देखील कुठल्याच प्रकारे कार्यवाही होताना दिसली नाही दरम्यान रेती माफिया याकडे नदीकाठावर मालाच्या साठवणुकीसाठी स्थानिकांच्या ट्रॅक्टर लावल्या होत्या. या ट्रॅक्टर द्वारा रात्रभर नदीपात्रातून मालाची डम्पिंग सुरू होती.सदर प्रकार सुरू असताना याची गोपनीय माहिती गोंडपिपरी चे तहसीलदार के.डी. मेश्राम यांना मिळाली माहितीच्या आधारावर त्यांनी आपल्यासह पोलीस पथक घेऊन घटनास्थळ गाठले. यावेळी स्थानिक कुलथा गावातील पोलीस पाटील व सरपंच यांच्या मदतीने त्यांनी कुलथा गावाजवळ रेतीने भरलेल्या चार ट्रॅक्टर जप्त केल्या. त्याच वेळी गोंडपिपरी येथील शिवाजी चौकात रेती वाहतूक करणाऱ्या पुन्हा एका ट्रॅक्टरला पकडले एकूण या पाचही ट्रॅक्टर वर कार्यवाही करून सदर ट्रॅक्टर गोंडपिपरी पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आल्या.गुरुवारच्या पहाटेच्या कार्यवाही नंतर शुक्रवारी महसूल विभागाचा अहवाल पोलिसांना सादर करण्यात आला. या प्रकरणी तपास सुरू आहे. आणि पुढील कार्यवाही गोंडपिपरी पोलीस प्रशासनामार्फत केली जाणार आहे.

 

ट्रॅक्टर मालक-चालकाचे काम कुणासाठी?

कुलता घाटातून रेतीचा उपसा करून त्याची वाहतूक करण्यात आले. यादरम्यान तहसीलदाराने चार ट्रॅक्टर पकडल्या. आता पोलीस व महसूल प्रशासनाकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यादरम्यान सदर ट्रॅक्टर चालक व मालकांचा बयान नोंदवून कुलथा नदीघाटावर कुणासाठी त्यांचे काम सुरू राहिले याचे चाचपणी होण्याची गरज आहे यातून रेती व्यवसायातील बडा मासा गडाला लागण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here