सरपंचाच्या पतीकडून शिवसेना उपतालूका कार्यकर्त्याला बेदम मारहाण

0
668

सरपंचाच्या पतीकडून शिवसेना उपतालूका कार्यकर्त्याला बेदम मारहाण

 

चामोर्शी : तालुक्यातील मार्कंडा (देव) ग्रामपंचायत येथील सरपंच उज्वला मृत्युंजय गायकवाड यांचे पती मनोज आनंदराव हेजिब यांनी कोरोना काळात मार्कंडा येथे नाटकाचे प्रयोग दिनांक 10 जानेवारीला 2022 ला आयोजित केला होता. आदिवासी बांधवांनी कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पोलीस विभाग चामोर्शी व तहसीलदार चामोर्शी यांना पत्र देऊन त्यांचे नाटक रद्द केले. याच गोष्टीचा मनात वैर ठेऊन दुसऱ्या दिवशी मार्कंडा देव येथिल चौकात दुपारी अंदाजे 12 वाजताच्या सुमारास अमित क्षिरसागर हे एक वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन असता सरपंचाचे पती मनोज आनंदराव हेजीब व त्यांचे सहकारी हे मिळून अमित क्षिरसागर याला तू आमचा नाटकाचा प्रयोग का रद्द केला व तुझ्यामुळे आमचे खुप मोठे आर्थिक नुकसान झाले असे म्हणून अमित क्षिरसागर याला बेदम मारहाण सुरु केली. मारहानी मध्ये अमित क्षिरसागर यांच्या नाकातून रक्त निघणे सुरु झाले असता अश्याच अवस्थेत त्यांनी ताबडतोब चामोर्शी पोलिस स्टेशन येथे जाऊन त्यांच्या नावाची तक्रार द्यायला गेले असता ठाणेदार हजर नव्हते. स्टेशन डायरिवर फक्त दोन पोलीस होते. त्या पोलिसांनी अमित क्षिरसागर याला ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे तपासणी करीता नेले असता तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इथे तपासणी होणार नाही म्हणून त्यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे जाण्यास सांगितले. तेव्हा अमित क्षिरसागर याला पोलिस विभागाने किंव्हा रुग्णालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यानी गडचिरोली सामान्य रुग्णालय घेऊन गेले नाही. त्यामुळे अमित क्षिरसागर हे स्वतः गाडी करून सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचारासाठी गेले. तरी सरपंच यांचे पती मनोज हेजीब यांचेवर पोलिस स्टेशन चामोर्शी येथे कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. याचा अर्थ असा की आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासन करत आहे. अजूनही आरोपी मोकाट गावात फिरत आहे. तसेच घटना स्थळी जावून अजूनपर्यंत कोणताही मोका पंचनामा पोलिस प्रशासन यांनी केला नाही. तरि या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून आरोपीला अटक करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा आदिवासी समाज बंधवाकडून पोलिस मुख्यालय गडचिरोली येथे उपोषण सह तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. असा फिर्यादी यांनी इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here