माझ्या ज्युडाे कराटे स्पर्धेतील यशात प्रशिक्षक साहिल तापेकरी यांचा सिंहाचा वाटा – कु. सायली टाेपकर

0
515

माझ्या ज्युडाे कराटे स्पर्धेतील यशात प्रशिक्षक साहिल तापेकरी यांचा सिंहाचा वाटा – कु. सायली टाेपकर
चंद्रपूर🟩किरण घाटे🟥 माझ्या ज्युडाे कराटे स्पर्धेतील यशात प्रशिक्षक आर. एस. पी. साहिल तापेकरी यांचा माेलाचा व सिंहाचा वाटा असल्याचे मत दुधारीच्या २२ वर्षिय कु. सायली माराेती टाेपकर यांनी आज भ्रमणध्वनी वरुन बाेलतांना या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले .नुकतीच ती गाेव्याची ज्युडाे कराटे स्पर्धा झाल्यानंतर (आपल्या) स्वगावी परतली आहे. या स्पर्धेत सायलीने तिस-या क्रंमाकाचे पारिताेषिक प्राप्त केले आहे. विशेष उल्लेखनीय बाब अशी की सायली ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या नवाेदित सदस्या असुन त्या काेल्हापुर येथील महाविद्यालयात अभियांत्रिक शिक्षण पूर्ण करीत आहे. सामाजिक व क्रीड़ा क्षेत्रासाेबतच त्यांना शैक्षणिक क्षेत्रात विशेष रुची असुन त्यांचे वडील मुंबईत नाेकरी करीत अाहे.सध्या ती आपल्या आजाेबांकडे राहत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here