झरण येथे व्यक्तिमत्व विकास व ताणतणाव व्यवस्थापण प्रशिक्षण कार्यशाळा
चंद्रपुर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधन चंद्रपुर यांच्या मार्फत राबविला उपक्रम

झरण (कोठारी) कोठारी वन परीक्षेत्र, मध्य चांदा वनविभागात काम करणाऱ्या कोठारी, झरण, कन्हारगाव, तोहगाव, वन परिक्षेत्रातील, वनविभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दररोज खडतर सेवा करावी लागते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या जीवनात नेहमी ताणतणाव निर्माण होत असतो. व्यक्तीमत्व विकास व ताण-तणावाचे व्यवस्थापन यामाध्यमातून झरण येथे काल गुरुवार 4 मार्चला एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कोठारी वन परिक्षेत्र कार्यालय येथे कार्यशाळेला श्री. लंगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, जयेश देशमुख उपस्थीत होते. कोठारी, झरण रोपवाटिका येथे आयोजित प्रशिक्षणाला वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सदर कार्यशाळा कोठारी, धाबा, झरण, कन्हारगाव, तोहगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत कार्यरत अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. वन विभागात दैनंदिन कार्य करताना कर्मचाऱ्यांवर येणारा ताण शिवाय जंगल भागात काम करताना जाणवणारा त्रास यातून अनेकदा जीवन कठीण होत असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढीस लागत असते. कामाच्या अनियमिततेमुळे जेवण आणि झोप दोघांमधील संतुलन नसल्याने कर्मचारी आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होत असून रक्तदाब, मधुमेह आणि मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे कार्यालयातील ताणाचा, कामाचा परिणाम कौटुंबिक जीवनावर होत आहे. यातून मुक्ती कशी मिळवावी, यासाठी ताण-तणाव व्यवस्थापनासंबंधी कर्मचाऱ्यांना चंद्रपुर वन प्रबोधनी मार्फत श्री. खडसे, संचालक, श्री. प्रशांत खाडे, अपर संचालक यांचे मा्र्गदशनात सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.
श्री. जयेश देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी वागणे, बोलणे, व्यायाम, योग या माध्यमातून तणाव कसे कमी करायचे याविषयी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना देशमुख यांनी मानसिक तणावग्रस्त कर्मचाऱ्यांनी भूतकाळ आणि भविष्य काळातील गोष्टींवर भर न देता वर्तमानात जगणे शिकले पाहिजे असे सांगून नाते संबंधात दुरावा निर्माण होणारी परिस्थिती उत्पन्न न होऊ देण्याचा सल्ला यावेळी उपस्थित वनविभातील कर्मचाऱ्यांना दिला. कौटुंबिक नातेसंबध आणि अधिकाऱ्यांशी नाते कसे असावे याविषयी श्री. जयेश देशमुख व्याखाते यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी महानंद वाकडे, प्रशिक्षण सहाय्यक, चंद्रपूर वन प्रबोधिनी व चमु तसेच वनपाल श्री. पेदापल्लीवार व वनरक्षक श्री. घरझाडे झरण यांनी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात मोलाची कामगिरी बजावली.